शिक्षण निधी सुरू करण्यासाठी साकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 11:56 PM2018-08-21T23:56:48+5:302018-08-21T23:57:20+5:30

प्रवीण दरेकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; सहकार संघाचे दीड महिन्यापासून उपोषण

To fund the education fund, saplings | शिक्षण निधी सुरू करण्यासाठी साकडे

शिक्षण निधी सुरू करण्यासाठी साकडे

पालघर : राज्य सहकारी संघाचा शिक्षणनिधी पूर्ववत सुरू करण्याची मागणी आमदार प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शनिवारी भेट घेऊन केली. आपल्याला वेतन मिळावे आणि राज्य सहकारी संघाचा शिक्षण निधी पूर्वीप्रमाणे सुरू करावा, अशी मागणी करत राज्य सहकारी संघाचे कर्मचारी गेली दीड महिना सहकार आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर उपोषण करीत आहेत.
दोन दिवसांपूर्वी आमदार व राज्य संघाचे संचालक आमदार प्रवीण दरेकर यांनी उपोषणक करणाऱ्या कर्मचºयांची भेट घेतली. तसेच त्यांना लवकरात लवकर शिक्षण निधी पूर्वीप्रमाणे करण्यासाठी आपण मुख्यमंत्री व सहकार आयुक्तांची भेट घेऊन न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्या नंतर, सहकार आयुक्त कार्यालयात झालेल्या शासकीय समिती सोबतच्या बैठकीत दरेकर यांनी आपली आग्रही भूमिका मांडली व शासनाला शिफारस करण्याचे या समितीत ठरले.दरेकर यांनी राज्य सहकारी संघाच्या कर्मचाºयांना वेतन न मिळाल्याने त्यांची उपासमार होत असल्याचे यांनी विधिमंडळाच्या लक्षात यापूर्वीही आणून दिले होते. तसेच, त्यांना शिक्षण निधी देण्याची मागणीही विधान परिषदेत केली होती. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून, या विषयावर उपाययोजना करण्यासाठी सहकार अतिरिक्त आयुक्त तोष्णीवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानी त्यांची भेट घेऊन विषयची कल्पना दिली व त्यांच्या पगारकरीता तात्काळ निर्णय घेणे आवश्यक असल्याचे आग्रहाने सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडून सहकारमंत्र्यांना सूचना, कॅबिनेटमध्ये विषय घेणार
मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संपर्क साधून कॅबिनेट करीता राज्य सहकारी संघाचा शिक्षण निधी व वेतनाचा विषय घेण्याची सूचना दिली. त्यामुळे आता राज्य सहकारी संघाच्या कर्मचाºयांचा पगार व शिक्षण निधीचा विषय मार्गी लागण्याचे आशादायी चित्र निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्री या बाबत सकारात्मक असून ते व सहकार मंत्री राज्य संघाला न्याय देतील. तसेच सहकार चळवळीच्या शिक्षण प्रशिक्षण या विषयाला बळकटी मिळेल, असा विश्वास आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.

Web Title: To fund the education fund, saplings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.