चौपदरीकरण सुनावणी तहकूब; लोकप्रतिनिधींना आमंत्रण नाही, बोलावली बैठक, सुरू केली जनसुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 06:22 AM2017-11-03T06:22:49+5:302017-11-03T06:22:52+5:30

मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (एमयुटीपी-३) अंतर्गत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) च्या वतीने आज पालघर मध्ये विरार-डहाणू रोड रेल्वे चौपदरीकरण विषयीची सर्वंकष माहिती देण्याबाबत ची गुरूवारची जनसुनावणी मात्र प्रकल्पाविषयी ची योग्य माहिती न देणे, सर्व बाधितासह गावांना, लोकप्रतिनिधींना आमंत्रित न करणे यामुळे स्थानिक संतप्त झाल्याने तहकूब करावी लागली.

Four-pronged hearing adjourned; There is no invitation to people representatives, called meeting, started public hearings | चौपदरीकरण सुनावणी तहकूब; लोकप्रतिनिधींना आमंत्रण नाही, बोलावली बैठक, सुरू केली जनसुनावणी

चौपदरीकरण सुनावणी तहकूब; लोकप्रतिनिधींना आमंत्रण नाही, बोलावली बैठक, सुरू केली जनसुनावणी

Next

पालघर : मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (एमयुटीपी-३) अंतर्गत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) च्या वतीने आज पालघर मध्ये विरार-डहाणू रोड रेल्वे चौपदरीकरण विषयीची सर्वंकष माहिती देण्याबाबत ची गुरूवारची जनसुनावणी मात्र प्रकल्पाविषयी ची योग्य माहिती न देणे, सर्व बाधितासह गावांना, लोकप्रतिनिधींना आमंत्रित न करणे यामुळे स्थानिक संतप्त झाल्याने तहकूब करावी लागली.
पूर्ण तयारीनीशी याल तरच ही जनसुनावणी होईल असे स्थानिकांनी बजावल्या नंतर ही जनसुनावणी स्थगित करण्याची घोषणा ह्या प्रकल्पाचे उपमुख्य व्यवस्थापक आनंद कुलकर्णी ह्याना करावी लागली. पुढील जनसुनावणीची तारीख लवकरच घोषित करण्यात येईल असे ही त्यांनी सांगितले.
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन(एमआरव्हीसी)ही रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार यांनी स्थापन केलेली कंपनी असून त्याद्वारे मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी) अंतर्गत रेल्वे चे प्रकल्प साकारले जातात. ३ हजार ५५२ कोटी रु पये खर्चाच्या व सुमारे ६१.७७८ किमी लांबीच्या विरार-डहाणू लोहमार्गाच्या चौपदरीकरण मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पांतर्गत हे काम होणार असून पालघर स्टेशनच्या पूर्वेला फ्रेट कॅरिडोर उभारला जाणार असल्याने हे चौपदरीकरण पश्चिमेला करण्यात येणार आहे. पालघर नगरपरिषद इमारती सह मनोर रोड वरील माजी आमदार नवनीतभाई शहा यांच्या घरापासून सरळ रेषेतील पन्नास- शंभरवर्षाच्या जुन्या घर मालकांना व दुकानदारासह वसई, विरार, वैतरणा, सफाले, केळवे रोड, उमरोळी, बोईसर, वाणगाव, डहाणू इ.रेल्वे स्थानका नजीकच्या शेतकरी व घर मालकांना आजच्या जनसुनावणी मध्ये उपस्थित राहण्याची पत्रे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन व महसूल विभागाने पाठवली होती. त्यामुळे पश्चिमेकडील जमिनी संपादित करून त्यावरील घरे, इमारती, दुकाने भुईसपाट होण्याची शक्यता आहे. पालघर स्टेशन ते मनोर कडे जाणारा रस्ताही ह्या चौपदीकरणात बाधित होणार असल्याने शहरातील वाहतूकीचा प्रश्न अधिक जटील बनणार आहे. नियोजनाचा अभाव आणि चुकीच्या नोटिसांबाबत अधिकाºयांना फैलावर घेऊन निषेध करीत ही जनसुनावणी पूर्ण तयारीनिशी जाहीर करण्याची मागणी उपस्थितांनी केली. आमदार विलास तरे, ह्या उपमुख्य व्यवस्थापक आनंद कुलकर्णी, सहाय्यक अभियंता मेहर सिंग इ.अधिकारी उपस्थित होते.

कुठे, कसे, किती होणार आहे भूसंपादन
वसई : डोंगरे, नारिंगी, घासकोपरी, शिरगाव, कासराळी, पालघर : वाढीव, सरावली, करवाळे, सरतोंडी, सफाले, उंबरपाडा, नंदाडे तर्फे माहीम, कपासे, माकूणसार, रोठे, केळवे रोड, कसबे-माहीम, नवली, पालघर, गोठणपूर, कोळगाव, उमरोली, बिरवाडी, पंचाळी, कंबळगाव, खैरे, बोईसर, राणी शिगाव, तर डहाणू: वाणगाव, कापशी, आसनगाव व पळे येथील जमिनी संपादित होतील.

वसई : ६ गावांमध्ये १० हेक्टर खाजगी, २. हेक्टर शासकीय , ३ हेक्टर वन अशी १७ हेक्टर जमीन पालघर : २१ गावांतील २४ हेक्टर खाजगी, २ सरकारी व १ वन मिळून २७ हेक्टर जमीन डहाणू : ४ गावांतील ६ हेक्टर खाजगी, ४ हेक्टर शासकीय , ३ हेक्टर वन अशा १४ हेक्टर जमीनीचे संपादन करण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्पाच्या सूत्रांनी दिली.

Web Title: Four-pronged hearing adjourned; There is no invitation to people representatives, called meeting, started public hearings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.