वाड्यात दिवाळीसाठी फटाक्यांची दुकाने सजली; ग्राहकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 10:19 PM2018-11-02T22:19:58+5:302018-11-02T22:20:29+5:30

फॅन्सी फटाके अ‍ॅटमची धूम; ठाणे, रायगड, नाशिकहून येतात व्यापारी

Fireworks shops for Diwali in the castle; Customers' rush | वाड्यात दिवाळीसाठी फटाक्यांची दुकाने सजली; ग्राहकांची गर्दी

वाड्यात दिवाळीसाठी फटाक्यांची दुकाने सजली; ग्राहकांची गर्दी

googlenewsNext

- वसंत भोईर

वाडा : ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक जिल्ह्यात सर्वत्र फटाके विक्रीची दुकाने सजली असली तरी तेथील ग्राहक व किरकोळ विक्रेत्यांनी येथील प्रसिद्ध फटाके विक्रेत्यांच्या भव्य दुकांनाबाहेर रांगा लावल्याचे दिसत आहे. तमिळनाडूच्या शिवकाशीहुन थेट आयात होत असल्याने येथील फटाके तुलनेने खूप स्वस्त व फे्रश असल्याने वाड्यातील फटाक्यांचा व्यवसाय सर्वांच्याच पसंतीस उतरला आहे.

पूर्वी फटाक्यांचा धंदा हा दिवाळी पुरताच मर्यादित होता. मात्र, आता तो बारमाही बनला आहे. विविध सण, लग्न समारंभ, राजकीय पक्षांच्या सभा, निवडणुका आदी काळात फटाक्यांना मागणी असल्याने हा व्यवसाय वर्षभर आर्थिक पाठबळ देणार ठरत आहे. दिवाळी सण हा चार दिवसांवर येऊन ठेपला असल्याने फटाके विक्रेते व किरकोळ ग्राहक यांनी खरेदीसाठी एकच गर्दी केल्याचे दिसत येत आहे.

तामिळनाडूतील शिवा काशी येथे फटाक्यांचे उत्पादन केले जाते. येथून थेट फटाक्यांच्या माल वाड्यात आणला जात असल्याचे दिलीप ट्रेडर्सच्या मालकांनी सांगितले. यावरुन किती भव्य प्रमाणात हा व्यवसाय केला जातो याचा अंदाज येईल. दिलीप ट्रेडर्स हे वाड्यातील सर्वात मोठे व्यापारी. त्यांचे सर्व कुटुंब या व्यवसायात असून याकामी २५ ते ३० कामगार कार्यरत आहेत. सकाळी ८ ते रात्री उशिरा पर्यंत विक्री सुरू असते. या खालोखाल प्रितम ट्रेडर्स हे व्यापारी आहेत. गणपती सणापासून दिवाळीच्या दहा दिवस अगोदर पर्यंत घाऊक विक्रेत्यांची गर्दी असते. त्यानंतर किरकोळ विक्र ेते व ग्राहक फटाके खरेदी करतात अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. दिलीप ट्रेडर्स बरोबर प्रितम सेल्स एजन्सी, सिद्धिविनायक ट्रेडर्स, प्रसाद ट्रेडर्स, नंदकुमार ट्रेडर्स ही घाऊक फटाक्यांची दुकाने दिवाळीच्या वेळेस दिवस रात्र सुरू असून घाऊक व्यापारी व विक्रेत्यांनी फटाके खरेदीसाठी येथे गर्दी केल्याचे दिसून येत असून दिवाळीच्या हंगामात करोडोचा व्यवसाय होत आहे. वाहतूक खर्च, कच्च्या मालाच्या भावात वाढ, मंजुरीचे वाढलेले दर व इंधनाच्या भावात वाढ यामुळे फटाक्यांच्या किंमतीत वाढ झाली असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.

फॅन्सी फटाक्यांची किंमत ५० ते ५००० रूपयापर्यंत
सध्या फॅन्सी अ‍ॅटमला मागणी जास्त असून त्याचीच धूम आहे. फॅन्सी फटाक्यांची किंमत ५० रूपयापासून ५००० रूपयापर्यत आहे . यामध्ये फोटो फ्लॅश, जेट फाऊंटन, कलर गोळी, वंडर लाईट, स्वस्तीक व्हील, लाईटींग थंडर, मल्टी शॉट, मल्टी बार, रॉबेट, डान्सिंग, पॅराशुट, कलर बॉल, स्कॉचवे, हॅण्ड्रेट शॉट आदी आकाशातील रंगीबेरंगी फटाके यांना जास्त मागणी आहे. तर सुतळी बॉम्ब, फुलबाजा, अ‍ॅटम बॉम्ब, जमीन चक्र , अनार, लवंगी फटाकडी इत्यादी प्रकारही ग्राहकांना परवडणारे असून ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मल्टी शॉट, १२० शॉट, २४० शॉट याची किंमत २०० पासून १५०० पर्यंत, फुलबाजा ५ रूपयापासून २५० पर्यंत हजाराची माल २०० पासून ५०० पर्यंत अशा किंमती असल्याचे नंदकुमार ट्रेडर्स चे मोनिष आंबवणे यांनी सांगितले.

Web Title: Fireworks shops for Diwali in the castle; Customers' rush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.