प्रश्नपत्रिकांचा खर्च शिक्षकांच्या खिशातून

By Admin | Published: April 16, 2017 04:20 AM2017-04-16T04:20:27+5:302017-04-16T04:20:27+5:30

आदिवासी व दुर्गम भागातील शाळांना नियोजना अभावामुळे शैक्षणिक प्रगती चाचणीच्या अपूऱ्या प्रश्नपत्रिका पूरविल्या गेल्याने मुख्याध्यापक अडचणीत सापडले असून

Expenditure of papers from teachers' pockets | प्रश्नपत्रिकांचा खर्च शिक्षकांच्या खिशातून

प्रश्नपत्रिकांचा खर्च शिक्षकांच्या खिशातून

googlenewsNext

- शशिकांत ठाकूर,  कासा
आदिवासी व दुर्गम भागातील शाळांना नियोजना अभावामुळे शैक्षणिक प्रगती चाचणीच्या अपूऱ्या प्रश्नपत्रिका पूरविल्या गेल्याने मुख्याध्यापक अडचणीत सापडले असून वेळेवर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पूरवायच्या कशा असा गंभिर प्रश्न मुख्याध्यापक व शिक्षकांना पडला होता. त्यामुळे प्रश्नपत्रिकांचे झेरॉक्स काढण्यासाठी स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करण्याची वेळ शिक्षकांवर आली होती.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक मुल्यमापन करण्याचा हेतू पूढे ठेवून शासनाच्या शिक्षण विभागाकडून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ‘शैक्षणिक प्रगती चाचणी संकलित मुल्यमापन-२’ ची मराठी व गणित विषयाची परिक्षा ६ व ७ एप्रिल रोजी घेण्यात आली. मात्र, शिक्षण विभागाकडे सर्व शाळांमधील प्रत्येक इयत्तावर आॅनलाईन व आॅफलाईन माहिती उपलब्ध असतांना विद्यार्थी संख्येच्या मानाने शैक्षणिक संस्थांना कमी प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्या.
या प्रश्न पत्रिकेमध्येच उत्तर लिहावे लागत असून एक प्रश्नपत्रिका साधारण १० पानांची आहे. त्यांचा झेरॉक्स काढण्यासाठी एका प्रश्नपत्रिकेमगे साधारण १० रू. खर्च येतो. जास्त पटसंख्या असलेल्या शाळांना ५० ते ६० प्रनश्पत्रिका कमी दिल्यास ५०० ते ६०० रू खर्च करावा लागतो. तसेच वेळेवर झेरॉक्स काढावे लागत असल्याने विद्यार्थ्यांना पेपरसाठी ताटकळत बसावे लागते.

Web Title: Expenditure of papers from teachers' pockets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.