सेवा हक्क कायदा प्रभावीपणे राबवा, स्वाधीन क्षत्रिय यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 02:35 AM2018-02-09T02:35:04+5:302018-02-09T02:35:10+5:30

राज्य शासनाने लोकसेवा हक्क अधिनियम हा क्रांतिकारी कायदा जनहितासाठी आणि लोकांना अधिकार देण्यासाठी केला आहे.

Effective appeal of service rights, Swadheen Kshatriya appeals | सेवा हक्क कायदा प्रभावीपणे राबवा, स्वाधीन क्षत्रिय यांचे आवाहन

सेवा हक्क कायदा प्रभावीपणे राबवा, स्वाधीन क्षत्रिय यांचे आवाहन

Next

- अरिफ पटेल
मनोर : राज्य शासनाने लोकसेवा हक्क अधिनियम हा क्रांतिकारी कायदा जनहितासाठी आणि लोकांना अधिकार देण्यासाठी केला आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणांनी विहीत वेळेत नागरिकांना सुविधा उपलब्ध करू न देण्याबरोबरच या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी असे आवाहन राज्याचे मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी केले आहे.
पालघर जिल्ह्यातील मनोर येथे संपूर्ण सेवा अभियानांतर्गत महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम २०१५ अंतर्गत विविध सेवा शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, शासनाच्या सेवा विहीत कालावधीत व पारदर्शकपणे मिळाव्यात या उद्देशाने हा कायदा करण्यात आला आहे. सेवा हमी कायद्यानुसार ज्या कल्पना निश्चित केल्या होत्या त्या कल्पनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी पालघर जिल्ह्यामध्ये सुरु आहे ही बाब कौतुकास्पद आहे. तसेच, कातकरी समाजापासून सुरु केलेल्या संपूर्ण सेवा अभियानाची अंमलबजावणी ही अभिनंदनीय बाब असल्याचे सांगून त्यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले. आदिवासी बहुल जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू असल्या बाबत समाधान व्यक्त करीत जिल्हा परिषदेने गावोगावी हा कायदा पोहोचिवण्याच्यादृष्टीने नियोजन करावे असेही त्यांनी सांगितले.
व्यासपिठावर जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, लोकसेवा हक्क आयोगाचे उपसचिव संजय काटकर, उपजिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, जिल्हा परिषद सदस्य नीता पाटील, पंचायत समिती सदस्य श्रध्दा घरत, पालघरचे प्रांताधिकारी विकास गजरे, तहसीलदार महेश सागर आदी उपस्थित होते.
>सेवा शिबिरात विविध सेवांचे वाटप
या सेवा शिबिरात विविध सेवांचे वाटप क्षत्रिय यांच्याहस्ते करण्यात आले. यामध्ये महसूल विभागाच्या कातकरी जमातीच्या लाभार्थ्यांना जातीचे दाखले, राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य लाभार्थ्यांना धनादेश वाटप, शिधा पत्रिकां, कृषी विभागाच्या आत्मा नोंदणी प्रमाणपत्र, मागेल त्याला शेततळे, कार्यारंभ आदेश आदींचे वाटप करण्यात आले.पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागांच्या लाभार्थ्यांना व समाज कल्याण विभागाच्या लाभार्थ्यांना लाभ मंजूर झाल्याबाबतचे मंजूरी पत्र देण्यात आले. नंतच्या सत्रात त्यांनी मनोर ग्रामपंचायतीस भेट देवून सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीची पाहणी केली.
क्षत्रिय यांनी नागरिकांना आॅनलाईन अर्ज करण्यासाठी प्रवृत्त करावे अशा सूचना केल्या. आपले सरकार केंद्रात नागरिकांना सर्व प्रकाराच्या सेवांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करु न द्यावेत. तसेच ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे कौतुक केले. कार्यक्र माचे प्रास्तविक प्रांत विकास गजरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन तहसिलदार महेश सागर यांनी केले.
>सर्व प्रकारच्या सेवा दीड वर्षात गावोगावी
जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी, जिल्ह्यामध्ये संपूर्ण सेवा अभियानांतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच कातकरी उत्थान अभियानांतर्गत केलेल्या कामांची माहिती दिली. तसेच सर्व प्रकारच्या सेवा आगामी दीड वर्षात गावागावांपर्यंत पोहोचिवण्यासाठी नियोजन केले असल्याचे सांगितले. तर जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी जिल्हा परिषद यंत्रणा लोकसेवक म्हणून सर्वसेवा विहीत कालमर्यादेत देण्यास कटीबध्द असल्याचे सांगितले.

Web Title: Effective appeal of service rights, Swadheen Kshatriya appeals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.