ड्रग्ज म्होरक्या बंगळुरूमध्ये अटक, आरोपींवर मोक्कांंतर्गत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 01:59 AM2018-01-26T01:59:28+5:302018-01-26T01:59:46+5:30

वसई आणि तलासरी येथे पकडलेल्या कोट्यवधी रुपये किंमतीच्या अंमली पदार्थांची तस्करी करणा-या टोळीच्या म्होरक्याला पालघरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याच्या साथीदारासह बेंगलोर येथून तब्बल २७ दिवसांच्या अथक प्रयत्नाने ताब्यात घेतले.

 Drugs arrested in Chhattisgarh, Bangalore | ड्रग्ज म्होरक्या बंगळुरूमध्ये अटक, आरोपींवर मोक्कांंतर्गत कारवाई

ड्रग्ज म्होरक्या बंगळुरूमध्ये अटक, आरोपींवर मोक्कांंतर्गत कारवाई

Next

शशी करपे 
वसई : वसई आणि तलासरी येथे पकडलेल्या कोट्यवधी रुपये किंमतीच्या अंमली पदार्थांची तस्करी करणा-या टोळीच्या म्होरक्याला पालघरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याच्या साथीदारासह बेंगलोर येथून तब्बल २७ दिवसांच्या अथक प्रयत्नाने ताब्यात घेतले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ सप्टेंबर २०१७ रोजी वसईत तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून २१ लाख ७० हजार रुपये किंमतीचे ईपीड्रीन नावाचे अंमली पदार्थ जप्त केले होते. एका नायजेरीयन सह तीन इसम सदर अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन जात असताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. अंमली पदार्थाचा साठा आलिशान आॅडी गाडीतून नेला जात होता. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास सुरु असताना आरोपींनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तलासरी पोलीस ठाण्याच्या दापचरी दुग्ध प्रकल्पातील एका फॉर्म हाऊसवर छापा घातला होता. त्यावेळी पोलिसांनी एका फॉच्युनर गाडीतून ५ किलो २५० ग्रॅम हिराईन आणि २४ किलो ६९० ग्रॅम वजनाचे आयसोसॅफरॉल जप्त केला होता. त्यावेळी याठिकाणी अंमली पदार्थ बनवण्यासाठी लागणारी उपकरणे, साहित्य, दोन मशीन जप्त केली होती. या कारवाईत पोलिसांनी अंमली पदार्थासह कंपनीतील ४० कोटीचा माल जप्त केला होता. यावेळी प्रमुख सूत्रधार फैय्याज अहमद रसूल शेख आणि त्याचे दोन साथिदार यात गुंतले असल्याची माहिती हाती लागली होती.
फैय्याज आणि त्याच्या साथीदाराला शोधण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी आपल्या पथकासह १० डिसेंबर २०१७ रोजी हैदराबादला पोचले होते. फैय्याज, त्याचे साथिदार आणि कुटुंबिय मोबाईल फोनवरून नेट कॉलचा वापर करीत असल्याने त्यांना पकडणे मोठे आव्हान होते. अशा स्थितीतही पोलिसांनी हैदराबाद येथे फैय्याजचा ठिकाणा शोधून काढला होता. मात्र, हॉटेल मॅनेजरने माहिती आल्याची माहिती दिल्याने फैय्याज निसटला होता.
२७ डिसेंबर २०१७ ला फैय्याज बेंगलोरमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर लांगी आपल्या पथकासह त्याठिकाणी तळ ठोकून बसले होते. अखेर तब्बल २७ दिवसांनी २२ जानेवारी २०१८ ला फैय्याज आणि त्याचा साथिदार साजीद शेख बेंगलोरमधील जयनगर परिसरात पोलिसांच्या हाती लागला. त्याआधी फैय्याजचा भाऊ रियाज अहमद रसुल शेख याला १२ आॅक्टोबर २०१७ रोजी वसईतून अटक करण्यात आली होती.
फय्याजविरोधात माणगाव, हैदराबाद, अहमदाबादमध्ये गुन्हे दाखल
वसई आणि तलासरी येथे पकडण्यात आलेल्या ड्रग्जच्या टोळीचा म्होरक्या हाती लागल्याने अनेक गुन्ह्यांची उकल होण्यास सुरुवात झाली आहे. फैय्याजविरोधात रायगड जिल्ह्यातील मानगाव, हैदराबाद आणि अहमदाबाद येथे अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
ड्र्ग्जप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. २७ दिवसांनी २२ जानेवारी २०१८ ला फैय्याज आणि त्याचा साथिदार साजीद शेख बेंगलोरमधील जयनगर परिसरात पोलिसांच्या हाती लागला.
गुन्ह्याचा तपास सुरु असताना आरोपींनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तलासरी पोलीस ठाण्याच्या दापचरी दुग्ध प्रकल्पातील एका फॉर्म हाऊसवर छापा घातला होता. त्यावेळी याठिकाणी अंमली पदार्थ बनवण्यासाठी लागणारी उपकरणे, साहित्य, दोन मशीन जप्त केली होती.

Web Title:  Drugs arrested in Chhattisgarh, Bangalore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.