डॉ. आंबेडकर भवनाचे काम मार्गी लागणार- प्रताप सरनाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 11:44 PM2018-10-30T23:44:42+5:302018-10-30T23:45:10+5:30

निधीअभावी रखडलेल्या या सांस्कृतिक भवनाचे काम मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

Dr. The work of Ambedkar Bhawan will be started - Pratap Sarnaik | डॉ. आंबेडकर भवनाचे काम मार्गी लागणार- प्रताप सरनाईक

डॉ. आंबेडकर भवनाचे काम मार्गी लागणार- प्रताप सरनाईक

Next

मीरा रोड : मीरा - भार्इंदरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन अर्थात विपश्यना व बहुउद्देशीय केंद्र बांधण्यासाठी लागणाऱ्या ३० कोटी रूपयांपैकी राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात साडेतेरा कोटींचा निधी मंजूर केला असून महापालिका दीड कोटी खर्च करणार आहे. यामुळे निधीअभावी रखडलेल्या या सांस्कृतिक भवनाचे काम मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

मीरा- भार्इंदरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र व्हावे अशी मागणी सरनाईक यांनी सरकारकडे सातत्याने चालवली होती. बेवर्ली पार्क भागातील नियोजित न्यायालय इमारतीजवळ असलेली तीन हजार ८०० चौरसमीटर सकारी जमीन मंजूर करण्यात आली आहे. महापालिकेने खासगी संस्थेकडून प्राथमिक प्रस्ताव तयार करून घेत त्यासाठी ३३ कोटी ६० लाख रूपयांचा खर्च असल्याचे अपेक्षित धरले होते. तळघर, तळमजला अधिक तीन मजले असे हे केंद्र होणार असून यामध्ये विपश्यना केंद्र , मंगल कार्यालय , प्रदर्शन सभागृह , मिनी थिएटर , वाचनालय , ग्रंथालय आदी सुविधा असतील. शिवाय डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावरील जीवनपट साकारला जाणार आहे.

परंतु महापालिके कडे पैसे नसल्याने हे केंद्र सरकारच्या माध्यमातून बांधण्यासाठी सरनाईक यांनी सामाजिक न्याय विभाग व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले होते. या संदर्भात चार दिवसांपूर्वीच सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांच्या दालनात एक बैठक झाली होती. या बैठकीला अवर सचिव अनिल अहिरे, आ. सरनाईक, पालिका आयुक्त बालाजी खतगावकर, कार्यकारी अभियंता दीपक खांबित, नगरसेवक अनंत शिर्के उपस्थित होते. 

बैठकीत सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांनी यासाठी येणाºया खर्चापैकी राज्य सरकार पहिल्या टप्प्यात १३ कोटी ५० लाख तर पालिका दीड कोटी खर्च करणार असा निर्णय घेतला. तसेच हे स्मारक पूर्ण झाल्यावर याच्या देखभालीची जबाबदारी मीरा-भार्इंदर पालिकेवर निश्चित केली. त्यामुळे निधीअभावी रखडलेल्या केंद्राचा मार्ग मोकळा झाला आहे.

श्रेय लाटण्यासाठी करतील आटापिटा
सरकार दरबारी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून आंबेडकरी जनतेची इच्छा पूर्ण होईल, असे आमदार सरनाईक म्हणाले.
याचे फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणारेही आटापिटा करतील, असा चिमटा प्रताप सरनाईक यांनी भाजपाचे नाव न घेता काढला.

Web Title: Dr. The work of Ambedkar Bhawan will be started - Pratap Sarnaik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.