मीरारोड : भरधाव वाहनाच्या धडकेत दीड वर्षाच्या बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2017 09:47 PM2017-10-01T21:47:29+5:302017-10-01T21:47:56+5:30

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर घोडबंदर खिंडीत एका भरधाव वाहनाच्या धडकेत दिड वर्षाच्या बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू झाल्याची घटना आज रवीवारी घडली आहे. 

Death of a half-year-old leopard dies in a ferryman's vehicle | मीरारोड : भरधाव वाहनाच्या धडकेत दीड वर्षाच्या बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू

मीरारोड : भरधाव वाहनाच्या धडकेत दीड वर्षाच्या बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू

Next

मीरारोड : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर घोडबंदर खिंडीत एका भरधाव वाहनाच्या धडकेत दीड वर्षाच्या बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू झाल्याची घटना आज रवीवारी घडली आहे. काशिमीरा पोलिस ठाणे हद्दीतून जाणारा मुंबई - अहमदाबाद महामार्ग हा घोडबंदर खिंडीतुन जातो. आज रवीवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास खिडीतुन जाणारया मार्गावर बिबट्याचे पिल्लु मृत अवस्थेत आढळुन आले. सदर बाब वन खात्याचे अधिकारी व काशिमीरा पोलिसांना समजल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

बिबट्या हे अंदाजे दिड वर्षाचे पिल्लु असुन भरधाव वेगाने जाणारया अनोळखी वाहनाने त्याला धडक दिल्याने त्याचा मृत्यु झालाय. सदरची घटना आज पहाटे सुमारे ५ च्या सुमारास घडल्याचे सांगीतले जाते. 

वनक्षेत्रपाल संजय वाघमोडे, डॉ. पेठे, कर्मचारी खरात आदींनी बिबट्याच्या पिल्लाचा मृतदेह ताब्यात घेतला असुन शवविच्छेदन केले जाणार आहे. या घटने नंतर पिल्लाची आई वा नर यांचा परिसरात वावर वाढण्याची शक्यता पाहता वन अधिकारयांनी वन विभागाच्या जागेत वसलेल्या मॉर्डन झोपडपट्टी मध्ये जाऊन रहिवाशांना खबरदारीच्या सुचना दिल्या आहेत. रहिवाशांनी कचरा बाहेर ठेऊ नये, रात्रीच्या वेळी शौचास बाहेर जंगलात जाऊ नये, कोंबड्या, कुत्री आदी पाळीव प्राणी बाहेर ठेऊ नये अशा सुचना रहिवाशांना केल्या आहेत. 

दरम्यान घोडबंदर खिंडीतुन महामार्ग जात असुन वास्तविक पुर्वी पासुनच या परिसरात बिबट्यांचे वास्तव्य व वावर आहे. बिबटे हे महामार्ग ओलांडुन नेहमीच खाली असलेले जंगल, झोपडपट्टी तसेच घोडबंदर गाव भागात भक्ष्य शोधत असतात. खिंडीतले वळण तिव्र असले तरी वाहनं ही खुपच वेगाने ये जा करत असल्याने या आधी देखील बिबट्यांच्या अपघाती मृत्युच्या घटना घडलेल्या आहेत. त्यातच आता महामार्गाचे रुंदिकरण होणार असल्याने बिबट्यांचे प्राण आणखीनच धोक्यात येणार आहेत. 

येथे केवळ फलक लाऊन भागणार नसुन वाहनांचा वेग आवरण्यासाठी खिडीच्या दोन्ही दिशेला महामार्ग प्राधिकरण व वाहतुक विभागाने आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याची गरज निर्माण झाल्याचे मत प्राणिमित्रांनी व्यक्त केले आहे. तशीच स्थिती घोडबंदर मार्गावर काजुपाडा खिंडीत देखील असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

Web Title: Death of a half-year-old leopard dies in a ferryman's vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.