डहाणू भाजपात झाले मोठे इनकमिंग

By admin | Published: January 23, 2017 05:08 AM2017-01-23T05:08:51+5:302017-01-23T05:08:51+5:30

आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या उपस्थितीत डहाणू शहर आणि परिसरातील राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी तसेच

Dahanu has become a big incoming party | डहाणू भाजपात झाले मोठे इनकमिंग

डहाणू भाजपात झाले मोठे इनकमिंग

Next

डहाणू : आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या उपस्थितीत डहाणू शहर आणि परिसरातील राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी तसेच अन्य काही पक्षातील ४०० हून अधिक पुढारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. रविवारी सकाळी प्रचार करणाऱ्या वाहनांची रॅली काढली होती. त्यामुळे डहाणू भाजपमय झाले होते.
सर्व सामन्यात लोकांना न्याय देण्यासाठी डहाणू नगर परिषदेत भाजपची सत्ता आणायची आहे. त्यामुळे आपण आतापासून कामाला लागून डहाणू नगर परिषदेवर भगवा फडकवलाच पाहिजे. डहाणू नगरपरिषदेचा भ्रष्टाचार बाहेर काढून दोषींना शिक्षा झालीच पाहीजे, असे प्रतिपादन त्यांनी केले. पालघर जिल्ह्याचा विकास हेच आमचे स्वप्न आहे. असेही ते म्हणाले. मसोली येथील दशश्री माळी हॉल येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्र माला खासदार चिंतामण वनगा, आमदार तथा जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे, जि.प.अध्यक्षा सुरेखा थेतले, प्रदेश सदस्य बाबजी काठोळे, भाजपचे नेते भरत राजपूत, शहराध्यक्ष भरत शहा, जि.प.सदस्या विनिता कोरे, पंचायत समिती सभापती चंद्रीका आंबात,नौशीर इराणी,सदानंद करंदिकर, जि.प.सदस्य, पंचायत समिती सदस्य नगरसेवक तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
(वार्ताहर)

Web Title: Dahanu has become a big incoming party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.