अपात्र उमेदवार ठोठावणार न्यायालयाचे दरवाजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 11:29 PM2019-03-09T23:29:11+5:302019-03-09T23:29:29+5:30

पालघर नगर परिषदेची रणधुमाळी; छाननीमध्ये भाजपाच्या दोघींना नगरसेवकपदाची लॉटरी

Court doors to nominate ineligible candidates | अपात्र उमेदवार ठोठावणार न्यायालयाचे दरवाजे

अपात्र उमेदवार ठोठावणार न्यायालयाचे दरवाजे

Next

पालघर : महिला दिनी पालघर नगर परिषदेच्या दोन इच्छुक महिला उमेदवारांना विरोधकांचे अर्ज बाद झाल्याने नगरसेवक पदाची लॉटरी लागली असली तरी अर्ज बाद झालेले नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांचा मुलगा प्रथमेश पिंपळे, अपक्ष निहारिका संखे आणि काँग्रेसच्या कृपाली संखे हे न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याने त्याचा काय निकाल लागतो याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

पालघर नगर परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान शुक्रवारी प्रभाग क्रमांक ७ मधून भाजपाच्या उमेदवार अलका राजपूत आणि प्रभाग १० मधील गीता संखे या दोन्ही महिला उमेदवारांच्या विरोधातील उमेदवारांच्या अर्जात सूचक नसणे, स्वाक्षरी नसणे आदी त्रुटीमुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचे अर्ज बाद केल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. महिला दिनाच्या दिवशीच दोन्ही महिलांची निवड झाल्याने भाजपाने फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला होता. पालघर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत नगरसेवक पदासाठी १४८ तर नगराध्यक्ष पदासाठी ११ अर्ज दाखल झाले होते.

शुक्रवारी सकाळी ११ वाजता छाननीला सुरु वात झाली. यावेळी प्रभाग क्र मांक ७ ब (सर्व साधारण महिला) भाजपाच्या उमेदवार अलका राजपूत यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या आरती हिमालय संखे, भाजपाच्या (डमी) प्रीती विवेक सामंत तर अपक्ष निहारिका नैवद्य संखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर प्रभाग क्र मांक १० अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग) मध्ये भाजपाच्या उमेदवार गीता पिंपळे यांच्या विरोधात काँग्रेसच्या कृपाली कमलेश संखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

भाजपाच्या दोन्ही उमेदवारांच्या विरोधातील उमेदवारांच्या अर्जात सूचक नसणे, स्वाक्षरी नसणे, प्रभागा बाहेरचे सूचक नेमणे आदी चुका आढळून आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी विकास गजरे यांनी ११ उमेदवारांना छानणीत अपात्र ठरविले. त्यामुळे भाजपाच्या राजपूत आणि पिंपळे याची बिनविरोध निवड झाली. तर १४८ उमेदवारी अर्जा पैकी १५ उमेदवारांनी भरलेल्या २४ नामनिर्देशित पत्रावर पक्षाचे ए-बी फॉर्म नसल्याने त्यांनाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले. त्यामुळे १४८ उमेदवारी अर्जा पैकी ३५ उमेदवारी अर्ज अपात्र ठरविण्यात आले असून ११३ अर्ज पात्र झाले.१३ मार्च रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. अपात्रते प्रकरणी प्रथमेश पिंपळे याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्यावरील गंडातंर न्यायालयत दुर होईल असे सांगितले.

छानणीत अपात्र ठरविलेल्या ११ उमेदवारांची नावे
१ ब) रश्मी यादव
७ ब) आरती संखे
७ ब) निहारिका संखे
८ ब) भारती फासे
९ ब) प्रथमेश पिंपळे
१० अ) वृषाली संखे
१० ब) आदित्य संखे
११ ब) भूषण संखे
१२ ब) अशोक पाटील
१२ ब) सुनील राऊत
१३ ब) चंद्रकांत राऊत

Web Title: Court doors to nominate ineligible candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palgharपालघर