रोडची चाळण तरीही ठेकेदारांची बिले काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 03:13 AM2018-09-01T03:13:15+5:302018-09-01T03:13:39+5:30

भिवंडी-वाडा-मनोर रस्त्यामधील भ्रष्टाचार : सुप्रीमनंतर शिवशाहीनेही केले उखळ पांढरे

The contractor's bills are still drawn to the road chalking | रोडची चाळण तरीही ठेकेदारांची बिले काढली

रोडची चाळण तरीही ठेकेदारांची बिले काढली

Next

वाडा : भिवंडी-वाडा-मनोर या रस्त्यावर गेल्या काही महिन्यात पडलेले खड्डे भरण्याच्या कामात ठेकेदाराने अधिकाऱ्यांच्या संगनमताने लाखोंचा गैरव्यवहार केला आहे. या कामाची चौकशी करण्याची मागणी भिवंडी चे आमदार रु पेश म्हात्रे यांनी राज्याच्या मुख्य अभियंत्यांकडे एका तक्र ारीद्वारे केली आहे.

या तक्रारीत ते म्हणतात की, वाडा व भिवंडी या दोन तालुक्यांना जोडणारा हा अतिशय महत्त्वाचा मार्ग असून तो सुिप्रम कंपनीने अतिशय निकृष्ट दर्जाचा तयार केल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. लहान मोठे खड्डे आणि खचलेल्या साईट पट्ट्यांमुळे गत काही महिन्यात येथे अनेक अपघात घडलेले आहेत. या संदर्भात शासन स्तरावर अनेक लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांनी लेखी निवेदने, तक्र ारी आणि उपोषण करून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
साबाच्या अधिकाºयांनी संगनमताने सुप्रिम कंपनीला संरक्षण देण्याचे काम केल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे. या संदर्भात आम्ही शासनाचे लक्ष वेधल्यानंतर संबंधित विभागाला खड्डे भरण्याचे निर्देश देण्यात आले होते. पावसाळी अधिवेशनात सुद्धा आम्ही शासनाचे लक्ष वेधल्यानंतर बांधकाम विभागाकडून त्या संबधीची ई निविदा काढण्यात आली. त्यानुसार शिवशाही कन्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीने खड्डे भरण्याचे काम हाती घेतले.
अंदाजपत्रकानुसार खड्डे भरण्याचे काम होणे अपेक्षित असताना ठेकेदाराने हे फक्त कागदावरच केल्याचे दिसत आहे.
त्यासंबधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे माहिती घेतली असता. खड्डे भरण्याची कामे न करता सुमारे दोन कोटी रु पयांची बिले अदा करण्यात आली आहेत. खोटी बिले ठेकेदाराने अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमतानेच काढले असल्याचा गंभीर आरोप या तक्रारीत केला असून या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी केल्यास मोठा भ्रष्टाचार उघडकीस येऊ शकतो असे त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. या खड्डे भरण्याच्या कामाच्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून ठेकेदार कंपनीला काळ्या यादीमध्ये टाकून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच ठेकेदाराला काम न करताच बिले अदा करणाºया अधिकाºयांना निलंबित करा अशी मागणी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्याकडे एका तक्र ारीद्वारे केली आहे. त्याची मुख्य अभियंत्यांनी दखल घेऊन गुण नियंत्रण मंडळाला चौकशीचे आदेश दिले आहेत.

चौकशीचे आदेश
मुख्य अभियंत्यांनी आमदार रुपेश म्हात्रे यांच्या तक्रारीची दखल घेऊन गुण नियंत्रण मंडळाला चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती आमदारांचे स्वीय सहाय्यक रोहिदास शेलार यांनी लोकमतला दिली. भिवंडी-वाडा-मनोर या रस्त्यावर खड्डे भरण्यासाठी दोन कोटी २० लाख रु पयांचे अंदाजपत्रक मंजूर झाले असले तरी जूनपर्यंत भरलेल्या खड्ड्यांचे सुमारे ४० ते ४५ लाखांचे बील ठेकेदारास आदा केले असून उर्वरित रक्कम शिल्लक आहे अरविंद कापडणीस सायक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वाडा यांनी दिली आहे.

वाडा भिवंडी रस्त्यावरील अपघातांची संख्या पाहता. हे प्रकरण खूपच गंभिर आहे. त्यातच ठेकेदार शिवशाही कन्ट्रक्शन यांनी खड्डे भरल्याचे कागदोपत्री दाखवून कोट्यवधीचे बिल काढले आहे. त्याची चौकशी व्हावी!
- रुपेश म्हात्रे, आमदार

Web Title: The contractor's bills are still drawn to the road chalking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.