चिकूला पीक विम्याचे कवच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 11:59 PM2019-06-15T23:59:37+5:302019-06-16T00:00:02+5:30

पावती जपून ठेवा; अनेक फळांची बागायत असल्यास प्रत्येकाच्या क्षेत्राची विगतवारी करा

Chikula crop insurance cover! | चिकूला पीक विम्याचे कवच!

चिकूला पीक विम्याचे कवच!

Next

बोर्डी : पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा योजना या मृगबहाराकरीता चिकू फळाला लागू करण्यात आला आहे. यावेळी विमा हप्ता हेक्टरी २७५० रू. इतका व विमा संरक्षित रक्कम ५५,००० रू.असून विमा रक्कम भरलेली पावती जपून ठेवण्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संतोष पवार यांनी बागायतदारांकरिता आयोजित बैठकीत दिली.

शेतकऱ्यांनी विमा रक्कम भरल्यानंतर तो मंजूर झाल्यास हा हप्ता बँकेत जमा होतो किंवा नाही याबाबत शेतकऱ्यांनी दक्ष राहणे आवश्यक आहे. शिवाय बँकेचेही सहकार्य अपेक्षित असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कर्जदार व बिगर कर्जदार दोन्ही वेगळे असून कर्जदार शेतकºयांचा विमा हप्ता बॅँक परस्पर वसूल करून घेते. फक्त खात्री करून घ्यावी, बॅँंक खाते चालू असले पाहिजे, सातबारावर तीन-चार नावे असतील तर स्वयंघोषणा पत्रात ती नमूद करणे आवश्यक, विमा हप्ता भरल्यावर मेसेज प्राप्त होण्यासाठी मोबाईल नंबर नमूद करावा, असे बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी पुष्पेंद्रसिंह बजाज यांनी सांगितले.

काशिनाथ तरकसे जिल्हा अधीक्षक, पालघर हे प्रमुख मार्गदर्शक या बैठकीस उपस्थित होते. विमा हे उत्पादन साधन होवू नये. तर संरक्षण म्हणून विचार करावा. स्वयंघोषणा पत्र चुकीचे होऊ नये असे ते म्हणाले. शेतकºयाच्या एकाच क्षेत्रात चिकू, आंबा, नारळ पीक असते अशावेळी संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून क्षेत्राची विगतवारी करणे आवश्यक असून त्यामुळे प्रत्येक पिकाच्या विम्याचा लाभ घेणे सोर्यीचे होते. यावेळी लाभार्थी शेतकरी, बँक, विमा कंपनी यांच्या जबाबदारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

बागायतदारांनी विगतवारी कशी करावी?
एकाच क्षेत्रात चिकू, आंबा, नारळ पीक असते. तर उदा.- १:०० हेक्टर क्षेत्रात आंबा,चिकू,नारळ असेल तर ०.३० हे आंबा, ०.२० हे. नारळ व ०.५० हे. चिकू असे सातबारावर नमूद करावे.

Web Title: Chikula crop insurance cover!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.