भूसंपादन नसतांनाच बुलेट ट्रेनचे भूमीपूजन, शेतकरी, भूमीपुत्र संतप्त, प्रकल्प होऊ न देण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 01:20 AM2017-10-04T01:20:25+5:302017-10-04T01:21:04+5:30

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आवश्यकत्या जमिनीचे संपादन झालेले नाही, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या वन, पर्यावरण आदी खात्यांच्या अनुमत्या मिळालेल्या नाहीत...

Bullet train's decision not to allow project | भूसंपादन नसतांनाच बुलेट ट्रेनचे भूमीपूजन, शेतकरी, भूमीपुत्र संतप्त, प्रकल्प होऊ न देण्याचा निर्धार

भूसंपादन नसतांनाच बुलेट ट्रेनचे भूमीपूजन, शेतकरी, भूमीपुत्र संतप्त, प्रकल्प होऊ न देण्याचा निर्धार

Next

हितेंन नाईक
पालघर : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आवश्यकत्या जमिनीचे संपादन झालेले नाही, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या वन, पर्यावरण आदी खात्यांच्या अनुमत्या मिळालेल्या नाहीत. त्याचा सर्व्हेही पूर्ण झालेला नाही, असे असतांना या प्रकल्पाचे भूमीपूजन झालेच कसे असा सवाल भूमीपुत्रांनी केला असून काही झाले तरी हा प्रकल्प होऊ न देण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
मुंबईसह वैतरणा ते डहाणू दरम्यान उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसुविधांकडे लक्ष पुरविण्या ऐवजी त्यांच्या जमिनी प्रशासनाच्या माध्यमातून जबरदस्तीने मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याविरोधात पालघर व गुजरात राज्यातील काही संघटनानी एकजुटीचे दर्शन घडवीत रस्त्यावर उतरुन आपला विरोधाची ताकद दाखवून दिली आहे. आमच्या जमिनी घेऊन आम्हाला भूमिहीन करून विकासाच्या नावाखाली आमच्या छाताडावरून बुलेट ट्रेन नेण्याचा प्रयत्न हे सरकार करीत असल्याने शेतकरी, आदिवासी, मच्छीमारांमधून तीव्र संतप्त भाव उमटत आहेत.
जिल्ह्यातील तब्बल ११४ गावपाड्यातून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग जात असून सर्वाधिक गावपाडे पालघर तालुक्यात आहेत.
नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनच्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार ही गावे त्यात अंतर्भूत असल्याचे सांगण्यात येत असून अंतिम सर्वेक्षणानंतरच हा मार्ग निश्चित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाºयांसोबत झालेल्या बैठकांमध्ये कॉर्पोरेशनच्या अधिकाºयांनी सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे या बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत लागणाºया आवश्यक त्या परवानग्या घेतलेल्या नाहीत, संबंधित ग्रामसभा पुढे या प्रकल्पाची माहिती ठेवली नसतांना, संबंधित शेतकºयांची जमीन संपादित करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया राबविली गेली नसताना घाईघाईत याचे भूमीपुजन ही उरकण्यात आले आहे. मात्र मुंबईकराना लोकलच्या माध्यमातून नरकयातना भोगायला लावून स्वत:चा टेंभा मिरविण्यासाठी बुलेट ट्रेन प्रकल्प राबवण्यास भूमीपुत्रांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अनेक लहान-मोठ्या शेतकºयांच्या जमिनी जबरदस्तीने घेतल्या जाणार असून सर्वसामान्यांना भूमिहीन करून ही ट्रेन जिल्ह्यातील ११४ गावपाड्यातील शेतकºयांच्या छाताडावरुन जाणार आहे. अनेक पातळी वरून विरोध होत असतांना बुलेट ट्रेनचा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करण्यात येणार असल्याचा निर्धार केंद्र व राज्यसरकारने केला असून त्याला प्रशासनाची साथ लाभत आहे.

तलासरी तालुक्यातील : वरवाडा, उपलाट, धामणगाव, मानपाडा, सवणे, कारजगाव, अवरपाडा, झरी-पाटीलपाडा

वसई तालुक्यातील : पोमण, कामण, देवदल-कोलही, चिंचोटी, सातीवली, वालीव, धानिव, चांदनसार, शिरगाव, खीरपाडा, पोइनार, टोकरे-धानीसार, कसराली, धानीसार, तिवरी पाडा, जिम्बल पाडा, हावळ पाडा, वनी पाडा, राजीवली, गोखिरे, गावरान पाडा, गास पाडा, गासकोपरी ही गावे

डहाणू तालुक्यातील : गागणगाव, घंदाने, कोमगाव, वणई, नाईक पाडा, मधी पाडा, भवर पाडा, गोवणे, आखरमत पाडा, साखरे, कोठार पाडा, बवजा पाडा, डोंगरी पाडा, बघाडी पाडा, कोटमबी, दाभाडे, गावठाण पाडा, वणी पाडा, इभाड पाडा, नावसाखरे, पाटीलपाडा, पारसी पाडा, करमोड पाडा, रेवाडी पाडा, काकड पाडा, आंबेसरी ही गावे.

पालघर तालुक्यातील : माकणे, कपासे, मायखोप, रामबाग, कान्द्रेभुरे, सरतोंडी, सरावली, कर्दळ, जलसार, शीलटे पाडा, विराथन बुद्रुक, तिघरे, मांडा, ठाणेपाडा, ठाकूरपाडा, देवीपाडा, रोठे, मावळा, हनुमान पाडा, भुताळमानपाडा, खैरापाडा, दांडाळपाडा, उम्बरपाडा, कमारे, वरखुंटी, नवली, नवली पाडा, अंबाडी, अर्जुनपाडा, शेलवली, धामटने, भही पाडा, देवखोप, नंडोरे, कळंबेदी, ठाकरे पाडा, काकरे पाडा, पडघे, कोळीपाडा, कल्लाळे, मान, बोईसर, बेटेगाव, भुताळपाडा, खुताड, शिगाव, वाळवे पाडा, बामन पाडा, सुमडापाडा, चंद्रा नगर ही गावे.

Web Title: Bullet train's decision not to allow project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.