भाजपा झाली फोटोचोर -गोऱ्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 02:49 AM2018-05-22T02:49:47+5:302018-05-22T02:49:47+5:30

वनगांच्या पत्नी, सून यांची संवाद यात्रा : पाणीप्रश्न सोडविण्याचे दिले आश्वासन

BJP went photo-photographer-Goreh | भाजपा झाली फोटोचोर -गोऱ्हे

भाजपा झाली फोटोचोर -गोऱ्हे

googlenewsNext


मनोर : भाजपची अवस्था फोटोचोरासारखी झाली आहे. ज्या वनगांची त्यांच्या हयातीत उपेक्षा केली. त्याच वनगांचा फोटो वापरून मते मागण्याची पाळी भाजपावर आली आहे अशी टीका आ. डॉ. नीलम गोºहे यांनी केली.
लोकसभेचे शिवसेना उमेदवार श्रीनिवास चिंतामण वनगा यांच्या प्रचाराच्या वेळी केली. मनोर जवळील गोवाडे येथून त्यांनी संवाद यात्रेला सुरूवात केली. कै. चिंतामण वनगा यांच्या पत्नी जयश्रीताई वनगा आणि धाकटी सून वर्षा वनगा यांच्या सोबत मनोर येथील गोवाडा गावापासून सुरूवात केली. या गावा मधील बैठकीमध्ये निरंकारी बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या प्रचार मोहिमेत नीता पाटील, सदस्य जि. प. श्रद्धा घरत, पं स. सदस्य व शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.
यावेळी स्थानिक महिलांनी गावातील पाण्याची व रस्त्याची समस्या मांडल्या. यावर त्यांनी ह्या समस्यां आपण जिल्हा पातळीवरच सोडवू पण गरज पडली तर विधिमंडळामध्येही पाठपुरावा करू असे स्पष्ट केले. दरम्यान पालघर जिल्हामध्ये सगळ्याच गावामध्ये पाणीप्रश्न असतांना पालघर जिल्हातील पाणी वसई विरारला कसे जाते असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुढे हमरापुर, कंचाड, आलोंडे, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, खोडाळा अशी ही संवाद मोहीम पार पडली या मोहिमेमध्ये रोशनी गायकवाड-धाराशिव, मृणाल यज्ञेश्वर-भिवंडी संपर्क संघटक, शुभदा शिंदे-शिर्डी संपर्क संघटक, वनिता देशमुख शिव सहकारी संघटना सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.

भावना अनावर
यावेळी चिंतामण वनगा यांच्या धाकट्या सून वर्षा प्रफुल्ल यांनी वनगा साहेबांनी भाजपची ४० वर्ष सेवा केली. पण जेव्हा आमच्या कुटुंबांला आधाराची गरज होती तेव्हा भाजपने आमच्या कुटुंबांला वा-यावर सोडले. पण जेव्हा आम्हाला राजकीयदृष्टया भाजपने रस्त्यावर आणले तेव्हा शिवसेनेने आम्हाला आधार दिला. त्यामुळे शेवटपर्यंत शिवसेनेचे काम करत राहू असे स्पष्ट केले. तर जयश्रीताई वनगा यांना दु:ख अनावर झाल्याने बोलता आले नाही.

Web Title: BJP went photo-photographer-Goreh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.