सेना,भाजपाचे रथी-महारथी मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 02:50 AM2018-05-26T02:50:14+5:302018-05-26T02:50:14+5:30

मतदार संभ्रमात : पालघर लोकसभा क्षेत्रातील गावागावांमध्ये पदयात्रा

Army, BJP's Rathi-Maharityi field | सेना,भाजपाचे रथी-महारथी मैदानात

सेना,भाजपाचे रथी-महारथी मैदानात

Next

पालघर : पालघर विधानसभेच्या मागील पोटनिवडणुकीत आपल्या खास शैलीद्वारे एकहाती विजय मिळवून देणारे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र फाटक हे सध्या पालघर विधानसभा क्षेत्रात गाव पाड्यात पायी फिरून आपली व्यूहरचना आखीत असल्याने विरोधकांच्या गोटात चिंता वाढली आहे. दुसरीकडे भाजपनेही सेनेच्या टीमला रोखण्याची रणनीती आखली आहे.
सेनेने श्रीनिवास वनगा यांना खासदारकीचा उमेदवार म्हणून घोषित केले. त्यामुळे डिवचलेल्या भाजपने काँग्रेसमधून राजेंद्र गावित यांना आपल्या पक्षात सामावून त्यांना खासदारकीची उमेदवारी दिली. या नाट्यमय घडामोडीनंतर भाजप व सेनेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून भाजपकडून स्वत: मुख्यमंत्री व कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री तीन जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार यांचा फौजफाटा तर शिवसेनेकडून स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री, ठाणे पालकमंत्री, खासदार आमदार यांचीही फळी जिल्ह्यात प्रचारासाठी तैनात केली आहे. सेनेच्या प्रचार फळीने उमरोली स्थानकांवर नसलेल्या अनारक्षित तिकीट प्रणालीचा मुद्दा असो किंवा स्थानकावर गाडयांना थांबा न देण्याच्या रेल्वेच्या धोरणाबाबत रेल्वे प्रशासनाशी चर्चा व पाठपुरावा करण्याची आश्वासने दिले आहे.
सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, आ.रवींद्र फाटक यांनी सध्या पालघर विधानसभा क्षेत्रातील केळवा, एडवण, उसरणी, कोरे, माहीम, शिरगाव, सातपाटी, बोईसर, कुंभवली, कोळवाडे, मुरबे, आलेवाडी, नवापूर, प्ररनाली, सालवाड, पाम-टेम्बी आदी किनारपट्टीवरील गावांना भेटी देत त्यांच्या समस्यांवर उपाययोजना आखात आहेत.

आंदोलनाला पाठिंबा
सेनेकडून आलेवाडी-नांदगाव च्या समुद्र किनाऱ्याच्या प्रस्तावित असलेला जिंदाल जेट्टी प्रकल्पाला स्थानिकांचा पूर्ण विरोध असल्याने तो मुद्दा हाताशी धरुन आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. एकुणच शिवसेनेचे नेतेमंडळी मतदारांना भेटून त्यांच्याशी शिवसेना स्टाईलने संपर्क साधत आहेत.

Web Title: Army, BJP's Rathi-Maharityi field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.