४०० बैलजोड्यांच्या विक्रीने ४ कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:35 AM2018-01-15T00:35:41+5:302018-01-15T00:35:44+5:30

महाराष्ट्रात प्रसिद्धीस पावलेल्या म्हसा यात्रेत २ जानेवारीपासून शनिवारपर्यंत ४०० बैलजोड्यांची विक्री होऊन चार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती ग्रामसेवक यशवंत म्हाडसे आणि खांबलिंगेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दशरथ पष्टे यांनी दिली.

4 billion sales turnover of 400 bulls sold | ४०० बैलजोड्यांच्या विक्रीने ४ कोटींची उलाढाल

४०० बैलजोड्यांच्या विक्रीने ४ कोटींची उलाढाल

Next

श्याम राऊत

मुरबाड : महाराष्ट्रात प्रसिद्धीस पावलेल्या म्हसा यात्रेत २ जानेवारीपासून शनिवारपर्यंत ४०० बैलजोड्यांची विक्री होऊन चार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती ग्रामसेवक यशवंत म्हाडसे आणि खांबलिंगेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दशरथ पष्टे यांनी दिली.
यात्रेत प्रसिद्ध असलेली हातोली, जांभूळ, गोडशेव, म्हैसूर आदी पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्र ी झाली. घोंगडी, चादरी, बेडशिट, ब्लँकेट, सतरंजी यांच्या खरेदीलाही चांगला प्रतिसाद लाभला. मात्र, मागील वर्षातील नोटाबंदी व जीएसटीचा परिणाम उलाढालीवर झाला, असे देवस्थानचे पष्टे म्हणाले. म्हसा येथील खांबलिंगेश्वर देवाची यात्रा पौष पौर्णिमेला सुरू होते. यंदा २ जानेवारीपासून सुरू झालेली ही यात्रा सोमवारी संपेल. यात्रेतील बैलांचा बाजार संपला असून मनोरंजनाचे खेळ थांबले आहेत. आता केवळ भांडी, घोंगड्या यांची दुकाने सुरू आहेत. यात्रेचे सुरुवातीचे दोन दिवस निराशाजनक विक्र ी झाली. मात्र, रविवार ७ जानेवारीला भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला.

शासनाचे ५ लाख अनुदान
महाराष्ट्रातील दोन नंबरची यात्रा असल्याने शासनाने यात्रेची सर्व जबाबदारी घ्यायला हवी, असे देवस्थानच्या ट्रस्टींचे म्हणणे आहे. यात्रेमधील पोलीस बंदोबस्तापासून नागरिकांचे आरोग्य, रस्ते, वीज, पाणी आणि मुक्कामी येणाºया भाविकांची निवासव्यवस्था करण्याची जबाबदारी शासनाने उचलायला हवी. परंतु, आरोग्यव्यवस्था सोडली तर बाकी सर्व जबाबदारी ग्रामपंचायत व खांबलिंगेश्वर देवस्थानावर ढकलून शासन नामानिराळे राहते, असे ट्रस्टींचे म्हणणे आहे. यात्रेला येणाºया भाविकांची संख्या लाखोंच्या घरात असताना शासनाकडून जेमतेम ५ लाख रु पयांचे अनुदान ग्रामपंचायतीला दिले जाते.

Web Title: 4 billion sales turnover of 400 bulls sold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.