25 vacancies in primary health center at Sakharsheet, huge loss of patients, hands finally endured by people's representatives | साखरशेत प्राथमिक आरोग्य केंद्रात २५ पदे रिक्त, रुग्णांचे प्रचंड हाल, लोकप्रतिनिधींनी टेकले अखेर हात
साखरशेत प्राथमिक आरोग्य केंद्रात २५ पदे रिक्त, रुग्णांचे प्रचंड हाल, लोकप्रतिनिधींनी टेकले अखेर हात

जव्हार : या तालुक्यातील साखरशेत प्राथमिक आरोग्य केंद्रातील २५ रिक्त पदांमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणारा परिसर हा लांब आणि द-याखो-यांचा आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा मिळण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. या रिक्त पदांची भरती करावी, अशी मागणी आहे.
साखरशेत प्राथमिक आरोग्य केंद्र हे गुजरात आणि दादरा नगर हवेली सिल्वासाला लागून आहे. वावर आणि दाभेरी हे दोन प्राथमिक आरोग्य फिरती पथके आहेत. तर प्राथमिक आरोग्य फिरते पथकांतर्गत साखरशेत, दाभोसा, वांगणी, कोरतड, देहेरे, चांभारशेत, असे सहा सबसेंटर्स आहेत.
या प्राथमिक आरोग्यकेंद्रात मंजूर पदे ३७ आहेत. यापैकी एकूण १२ पदे भरण्यात आली आहेत. तर २५ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या आरोग्य केंद्रातील रिक्त पदे पुढील प्रमाणे आहेत. वैद्यकीय अधिकारी-१ आरोग्य पर्यवेक्षक अधिकारी २, औषधे निर्माण अधिकारी २ , आरोग्य सेविका ९ , आरोग्य सेवक ६, शिपाई ५, असे एकूण २५ आरोग्य केंद्रात लोकसंख्यनेसार आरोग्य फिरते पथके आणि सबसेंटर असूनही रिक्तपदांमुळे अनेक सबसेंटरचे दरवाजे बंद आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्यसाठी हाल होत आहेत. तसेच विशेष करून येथील गरोदर मातांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.


Web Title: 25 vacancies in primary health center at Sakharsheet, huge loss of patients, hands finally endured by people's representatives
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.