१८८ शिक्षण सेवकांना केले कायम, आदेशाची प्रत सुपूर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 02:17 AM2018-01-10T02:17:43+5:302018-01-10T02:17:51+5:30

जिल्ह्यातील १८८ शिक्षण सेवकांना प्राथमिक शिक्षक म्हणून कायमस्वरूपी आदेश मंगळवारी जिल्हा परिषदेकडून प्राप्त झाले. जिल्हा परिषदचे अध्यक्ष विजय खरपडे व उपाध्यक्ष निलेश गंधे यांनी ह्या आदेशाची प्रत या सेवकांना सुपूर्द केले.

188 Education Servants have been appointed, handed over a copy of the order | १८८ शिक्षण सेवकांना केले कायम, आदेशाची प्रत सुपूर्द

१८८ शिक्षण सेवकांना केले कायम, आदेशाची प्रत सुपूर्द

Next

पालघर: जिल्ह्यातील १८८ शिक्षण सेवकांना प्राथमिक शिक्षक म्हणून कायमस्वरूपी आदेश मंगळवारी जिल्हा परिषदेकडून प्राप्त झाले. जिल्हा परिषदचे अध्यक्ष विजय खरपडे व उपाध्यक्ष निलेश गंधे यांनी ह्या आदेशाची प्रत या सेवकांना सुपूर्द केले. प्रथमच इतक्या कमी वेळेत कोणताही आर्थिक व्यवहार न होता हे काम करण्यात आल्याने उपस्थित शिक्षक सेवकांनी अध्यक्ष, व उपाध्यक्षाचे आभार मानले.
शिक्षण सेवक म्हणून या १८८ शिक्षकांचा ३ वर्षाचा कालावधी समाधानकारक रित्या पूर्ण करण्यात आल्यानंतर अध्यापन करून नियमानुसार त्यांना ३ वर्र्षांंनंतर प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्ती करावी लागते. या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षक होण्यासाठी व त्या संवर्गाची वेतन श्रेणी लागू होण्यासाठी जिल्ह्यातून शिक्षकांचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाले होते. मात्र, या प्रस्तावा वर काही त्रुटी काढल्या गेल्या. या त्रुटींची पुर्तता करून पुढील मार्गदर्शनासाठी सेवकांनी अध्यक्ष विजय खरपडे व शिक्षण सभापती व उपाध्यक्ष निलेश गंधे यांची भेट घेतली. यानंतर उपाध्यक्षांनी यासंदर्भातलक्ष घालून हा मुद्दा मार्गी लागण्यासाठी शिक्षणाधिकाºयांनी यात लक्ष घालायचे सुचविल्यानंतर या प्रस्तावांना गती मिळाली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रस्तावावर सह्या करून त्यांना प्राथमिक शिक्षक म्हणून कायम करून तसे नियुक्ती केल्याचे आदेश दिले. कमीत कमी कालावधीत हे प्रस्ताव तयार करून त्यावर अमलबजावणी झाली असल्याचा आनंदही यावेळी शिक्षण सेवकांनी आपल्या भाषणातून व्यक्त करीत यापुढेही शिक्षकांच्या प्रश्नात आपण लक्ष घालावी अशी मागणी केली. ह्यावेळी जिप समिती सभापती दर्शना दुमाडा, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पाटील, बिपीन संखे, खिन्नरे, ठाणगे, नंदकुमार संखे, आदी जिल्ह्यातील शिक्षक वर्ग उपस्थित होत.

वेतनश्रेणी मिळणार
हे शिक्षण सेवक पूर्वी शासनाच्या ६ हजार रु पये मानधन तत्वावर कार्यरत होते. मात्र, आता त्यांना प्राथमिक शिक्षक संवर्गातील वेतनश्रेणीचा लाभ मिळाला असल्यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणी दूर होणार आहेत.

Web Title: 188 Education Servants have been appointed, handed over a copy of the order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.