यशवंतनगरात धाडसी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 11:58 PM2019-07-10T23:58:24+5:302019-07-10T23:58:45+5:30

येथील यशवंतनगरातील प्रल्हाद लालचंद दूबानी यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातून रोख २० हजार रुपयांसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ७ लाख २० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चोरट्याची दहशत निर्माण झाली असून घटनेची नोंद हिंगणघाट पोलिसांनी घेतली आहे.

Yashwantnagar brave burglary | यशवंतनगरात धाडसी घरफोडी

यशवंतनगरात धाडसी घरफोडी

Next
ठळक मुद्देपरिसरात चोरट्यांची दहशत : ७.२० लाखांचा मुद्देमाल पळविला

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : येथील यशवंतनगरातील प्रल्हाद लालचंद दूबानी यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातून रोख २० हजार रुपयांसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ७ लाख २० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चोरट्याची दहशत निर्माण झाली असून घटनेची नोंद हिंगणघाट पोलिसांनी घेतली आहे. सदर घटना मंगळवारी रात्री घडली.
प्राप्त माहितीनुसार, प्रल्हाद दूबानी व त्यांचे कुटुंबीय हे यांच्या आईचे निधन झाल्याने त्यांच्या भावाच्या सिंधी कॉलोनीतील घरी गेले होते. तेथे पुजा सुरू होती. सुमारे ९ वाजताच्या सुमारास ते घरी परतले असता त्यांना समोरच्या दाराला कुलुप नसून आतून दार बंद असल्याचे दिसून आले. शिवाय घराचे मागील दार उघडे असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. बारकाईने पाहणी केली असता आलमारी उघडली. शिवाय त्यातील २० हजारांच्या रोखसह सोन्याच्या आठ बांगड्या, आठ अंगठ्या, सोनसाखळी, लॉकेट तसेच चांदीचे दागिने चोरट्याने चोरून नेल्याचे दिसून आले. तर चोरट्याने याच आलमारीतील चोर कप्प्यातील काही सोन्याचे दागिने नेले नसल्याचे दिसले. त्यानंतर प्रल्हाद दूबानी यांनी घटनेची माहिती हिंगणघाट पोलिसांना दिली.
चोरी झाल्याची माहिती मिळताच हिंगणघाट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक बागडे यांनी आपल्या चमूसह घटनास्थळ गाठून बारकाईने पाहणी केली. घटनास्थळी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. या घटनेची नोंद हिंगणघाट पोलिसांनी घेतली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे करीत आहे.

Web Title: Yashwantnagar brave burglary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर