वर्धेचा संतोष वाघ ठरला ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 10:14 PM2018-03-19T22:14:53+5:302018-03-19T22:14:53+5:30

येथील श्री हेल्थ व विदर्भ बॉडी बिल्डर्स अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. मेहेर झेंडे यांच्या स्मृत्यर्थ ‘जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव मेहेर श्री २०१८’ स्पर्धेचे आयोजन केले होते.

Wrestling Santosh Tiger becomes the 'champion of champion' | वर्धेचा संतोष वाघ ठरला ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन’

वर्धेचा संतोष वाघ ठरला ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन’

Next
ठळक मुद्देजिल्हास्तरीय शरीर सौष्ठव मेहर श्री २०१८ स्पर्धा : ८२ स्पर्धकांनी नोंदविला सहभाग

आॅनलाईन लोकमत
आर्वी : येथील श्री हेल्थ व विदर्भ बॉडी बिल्डर्स अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. मेहेर झेंडे यांच्या स्मृत्यर्थ ‘जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव मेहेर श्री २०१८’ स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन’ हा पुरस्कार वर्धेच्या संतोष वाघ यांनी पटकाविला.
भारतरत्न राजीव गांधी स्टेडीयमवर घेण्यात आलेल्या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार दादाराव केचे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक अशोक चौधरी तर अतिथी म्हणून विदर्भ बॉडी बिल्डींग चॅम्पीयन किशन तिवारी, नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, डॉ. श्यामसुंदर भुतडा, प्रा. अभय दर्भे, डॉ. रिपल राणे, बाळासाहेब नांदुरकर, सचिन होले, संजय भेंडे, राहुल गोडबोले, दशरथ जाधव, गौरव जाजू, अन्सार भाई, महफुज कुरेशी, परवेज साबीर, सतीश शिरभाते आदी उपस्थित होते.
केचे यांनी मार्गदर्शन करताना तरूणांनी मोबाईल, व्हॉटस् अ‍ॅपच्या मागे न लागता शरीर सौष्ठव कमविण्याकरिता व्यायामाकडे लक्ष दिले पाहिजे. सुदृढ आरोग्याचे तरूण हे राष्ट्राची संपत्ती ठरते, असे सांगितले.
वयोगटाप्रमाणे सहा भागात विभागून घेण्यात आलेल्या या स्पर्धेत ८२ स्पर्धक सहभागी झाले होते. यातील ५५ किलो वजनगटातील राहुल धामणकर, शेख शौकत, अमर ठाकरे, मंगेश मेश्राम, अनिल ढेकले यांनी, ६० किलो वजनगटातील ज्ञानेश्वर मडावी, रितेश दरवणे, धनराज गोहर, रितेश डिके, बादल धावरे यांनी, ६५ किलो वजनगटातील स्वप्नील कुरवाडे, पंकज ढाकुलकर, सुधाकर काळसर्पे, राहुल वैद्य, करण समुद्रे यांनी, ७० किलो वजनगटातील नितीन चव्हाण, अमित आगरे, सिद्धार्थ लुले, निरंजन संगीतवार, प्रवीण लांजेवार यांनी, ७५ किलो वजनगटातील राज डुलगज, अनिल पराते, प्रमोद आमटे, अनुराग वसु, योगेश चंडाले यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यांना पुरस्कार व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
शिवाय चॅम्पीयन आॅफ चॅम्पियन्सचा प्रथम पुरस्कार वर्धेच्या संतोष वाघ यांनी पटकाविला. बेस्ट मसल मॅनचा पुरस्कार स्वप्नील कुरवाडे यांनी पटकाविला तर बेस्ट पोजरचा पुरस्कार राज डुलगज यांनी प्राप्त केला.
परिक्षणाचे कार्य विदर्भ बॉडी बिल्डर्स अ‍ॅण्ड फिटनेस असो. च्या डॉ. राजू कोतेवार, दिनेश चवरे, स्वप्नील वाघुले, किशोर आदमने यांनी पार पाडले. संचालन क्रीडा प्रशिक्षक कपील ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्रीकांत ठाकूर यांनी केले. संचालन नितीन बोडखे यांनी केले तर आभार पंकज कदम यांनी मानले. स्पर्धेचे आयोजन विजय जयस्वाल (झेंडे), डॉ. योगेश देवतळे, डॉ. श्रीकांत ठाकूर यांनी केले होते. अफरोज खान, श्रीकांत निनावे, अनूप जैसिंगपुरे, कल्लू कुरेशी, योगेश चंडाले, स्वप्नील कुरवाडे, रूखसार कुरेशी, बिलाल कुरेशी, शक्ती पवार आदींनी सहकार्य केले.

Web Title: Wrestling Santosh Tiger becomes the 'champion of champion'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.