महिलांनी त्यांच्यावर होणाºया अन्यायाविरूद्ध आवाज उठवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 11:23 PM2017-09-01T23:23:49+5:302017-09-01T23:24:04+5:30

अमृता फडणविस : सिद्धिविनायक गणपती मंदिरात महिलांकरिता विशेष चर्चासत्र; मुख्यमंत्री दत्तक ग्रामच्या कामांनाही केला प्रारंभ

Women should raise their voices against injustice to them | महिलांनी त्यांच्यावर होणाºया अन्यायाविरूद्ध आवाज उठवावा

महिलांनी त्यांच्यावर होणाºया अन्यायाविरूद्ध आवाज उठवावा

googlenewsNext
ठळक मुद्देमहिलांनी त्यांच्यावर होणारा अन्याय मुकाट्याने सहन करू नये. होणाºया अन्यायाविरूद्ध आवाज उठवावा, असे आवाहन अमृता फडणविस यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : महिलांनी त्यांच्यावर होणारा अन्याय मुकाट्याने सहन करू नये. होणाºया अन्यायाविरूद्ध आवाज उठवावा, असे आवाहन अमृता फडणविस यांनी केले. येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरात आयोजित ग्रामस्थांच्या चर्चासत्रात उपस्थित महिलांशी चर्चा करताना त्या बोलत होत्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केळझर गाव दत्तक घेतले आहे. या गावात दत्तक ग्रामयोजनेंतर्गत येथे वॉटर एटीएम (जल शुद्धीकरण केंद्र) व तसेच नवीन बसस्थानाकरिता मंजूर निधीच्या धनादेशाचे वितरण अमृता फडणविस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खा. रामदास तडस, आ.डॉ. पंकज भोयर, माजी खासदार सुरेश वाघमारे, जि.प. आरोग्य व शिक्षण सभापती जयश्री गफाट, महिला व बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, सेलू पं.स. सभापती जयश्री खोडे, जि.प. सदस्य विनोद लाखे, राणा रणनवरे, सरपंच रेखा शेंदरे, मुख्यमंत्र्याच्या स्वीय सचिव आशा पठाण, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपसरपंच फारूख शेख, ग्रा.पं. चे सर्व सदस्य सिद्धीविनायक गणपती मंदिराचे अध्यक्ष माधव ईरूटकर, सचिव महादेव कापसे, मंदिराचे सर्व विश्वस्थ व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वप्रथम बाजार चौकातील कुशावर्ती विहिरीवर लावलेले वॉटर एटीएम (जल शुद्धीकरण यंत्र) चे व टाटा टिप्परचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर सिद्धीविनायक गणपती मंदिरात ग्रामस्थांशी चर्चा व लकी ड्रॉ द्वारे महिलांना साडी वितरणाचा कार्यक्रम झाला. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी प्रास्ताविकेतून मुख्यमंत्री दत्तक ग्राम योजनेतून केळझरच्या विकास करण्याकरिता पाच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याचे सांगितले. तसेच खासदार रामदास तडस यांनी येथील सिद्धीविनायक गणपती मंदिराचे ‘स्वदेशी दर्शन’ या केंद्र सरकारच्या योजनेत समाविष्ट करण्याकरिता ससंदेत प्रश्न उपस्थित केल्याचे सांगितले.
अमृता फडणविस यांनी सिद्धीविनायक गणपती मंदिराच्या मागे असलेला गणेश तलावचे खोलीकरण व सौंदर्यीकरणासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. यावेळी वॉटर एटीएम सेंटर तयार करून दिल्याबद्दल प्रसन्न मोहिले व डब्ल्यूसीएलच्या सीएसआर निधीतून टाटा टिप्पर करिता ५ लाख ३९ हजार २९९ रुपयांचा निधी तसेच नवीन बसस्थानकाकरिता १० लक्ष ४० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अरूणकुमार सिंग यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. संचालन किशोर महाजन यांनी केले.

आरोग्य मॅराथॉनचे उद्घाटन
पं. दिनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सेलू येथील दिपचंद चौधरी विद्यालय येथे आयोजित मुख्यमंत्री आरोग्य मॅराथॉनचे उद्घाटन अमृता फडणविस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माजी खासदार दत्ताजी मेघे यांची उपस्थिती होती.
बालकाच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. सोबतच वर्धा हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे जेथे लोकप्रतिनिधी, भाजपा तसेच भायुमोचे पदाधिकारी, भाजपा तसेच भाजयुमोचे पदाधिकारी, जि.प., पं.स. चे सर्व सदस्य एकत्रित येवून आरोग्यासाठी मेहनत घेत आहे, असे मत व्यक्त केले. अविनाश देव, नगर पंचायत सेलूचे गटनेता शैलेंद्र दफ्तरी, भाजपा तालुकाध्यक्ष अशोक कलोडे, सेलू शहर अध्यक्ष वरूण दफ्तरी तसेच भाजपा व भाजयुमोचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Women should raise their voices against injustice to them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.