वीज पडून दोन दुधाळू जनावरे दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 10:24 PM2019-06-05T22:24:54+5:302019-06-05T22:25:11+5:30

मंगळवारी सायंकाळी अचानक झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसादरम्यान वाई शिवारातील एका झाडावर वीज पडली. याच झाडाखाली विश्राती घेत असलेली दोन दुधाळ जनावरे दगावली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे पशुपालकाचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे.

Two milky animals were burnt down due to electricity | वीज पडून दोन दुधाळू जनावरे दगावली

वीज पडून दोन दुधाळू जनावरे दगावली

googlenewsNext
ठळक मुद्देवाई येथील घटना : दोन लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
रोहणा : मंगळवारी सायंकाळी अचानक झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसादरम्यान वाई शिवारातील एका झाडावर वीज पडली. याच झाडाखाली विश्राती घेत असलेली दोन दुधाळ जनावरे दगावली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे पशुपालकाचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे.
अल्पभुधारक शेतकरी दिनेश मेहरे यांनी शेतीला जोडधंदा म्हणून गोपालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. चारा व पाणी टंचाईच्या काळातही मोठ्या मेहनतीने ते आपल्याकडील दुधाळ जनावरांचे संगोपन करीत आहेत. अशातच त्यांनी नेहमीप्रमाणे शेतातील गोठ्या शेजारील झाडाच्या सावलीत जनावरे बांधली होती. तर सायंकाळी वातावरणात बदल होत सदर झाडावर वीज पडली. यात झाडा खाली बांधून असलेल्या दोन गाई ठार झाल्या. त्यामुळे शेतकरी तथा पशुपालक दिनेश मेहरे यांचे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली असून नुकसानग्रस्त पशुपालकाला शासकीय मदत देण्याची मागणी आहे.

Web Title: Two milky animals were burnt down due to electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.