आदिवासी समाजाचा मोर्चा

By admin | Published: August 24, 2014 12:09 AM2014-08-24T00:09:57+5:302014-08-24T00:09:57+5:30

धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये, या मागणीसाठी तालुक्यातील महिला-पुरूषांनी गुरूवारी तहसील कार्यालयासमोर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले़ गौरखेडा

Tribal Community Front | आदिवासी समाजाचा मोर्चा

आदिवासी समाजाचा मोर्चा

Next

तिढा आरक्षणाचा : निवेदनातून निर्णयाचा निषेध
आष्टी (शहीद) : धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये, या मागणीसाठी तालुक्यातील महिला-पुरूषांनी गुरूवारी तहसील कार्यालयासमोर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले़ गौरखेडा चौक येथे गोंडी ध्वजारोहण करून आंदोलनास प्रारंभ करण्यात आला़ आदिवासींच्या या आंदोलनामुळे आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे़
शहीद पंछी धुर्वे, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने तहसील कार्यालयावर धडकला़ धनगर ही एक जात आहे, त्याचा आदिवासी समाजाशी कोणताही संबंध नाही, धनगर ही आदिवासी जमात मूळची पश्चिम बंगालमधून अन्यत्र स्थलांतरीत झाल्याने ती बिहार, छत्तीसगड, मध्यप्रदेश दिशेने १९५१ ते १९७१ च्या कालखंडात महाराष्ट्राच्या गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात आढळून आल्याचे संदर्भ आहे़ धनगड व धनगर हे वेगवेगळे असून त्यांच्यात कोणत्याही प्रकारचे सोयरिक संबंध नाही़ धनगड ही मूळात आदिवासी जमात आहे़ त्यांना धानक, असे दुसरे नाव देण्यात आले आहे़ त्यांना ओरॉन वा उरॉब, असेही म्हणतात़ त्यांची मातृभाषा सादरी वा कुरूख आहे़ गोंड स्वत:ला राज म्हणून घेतात़ गोंडांना १२ देवापर्यंत पेनकुळी आहेत़ गोंड काली-कंकाली, भिवसन, सरोज पेन या देवांना मानतात़ धनगड घोसल माला, बडादेव, चिडीमाता यांना मानतात़ गोंडांत राज, कोलाम, परधान, पारधी, बैगा अशा गण जमाती आहेत़ यामुळे धरगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून आदिवासींच्या हक्कांवर गदा आणू नये, अशी मागणीही आंदोलनाद्वारे करण्यात आली़
शहरातून काढलेल्या मोर्चात धनगर समाजाला अनु़ जमातीमध्ये स्थान देऊ म्हणणाऱ्या लोकप्रनिधींचा निषेध करण्यात आला़ महिला पुरूष आदिवासी वेशभूषेत मोर्चात सहभागी झाले होते़ यावेळी अवचित सयाम, दिलीप मडावी, मारोती उईके, पांडुरंग कोडापे, महादेव धुर्वे, ज्ञानेश्वर मडावी, महेंद्र शिंदे, दादाराव धुर्वे आदींच्या शिष्टमंडळाद्वारे निवेदन सादर करण्यात आले़(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Tribal Community Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.