शासनाच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचा रस्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:58 AM2017-11-23T00:58:11+5:302017-11-23T00:59:07+5:30

भारनियमन रद्द करा, कापसाला सात हजार रुपये तर सोयाबीनला पाच हजार रुपये क्विंटल भाव द्या, या मागण्यांसाठी बुधवारी दुपारी १२ वाजता येथील विद्याविकास महाविद्यालय ते झेंडा चौक मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Stop the road for farmers protesting against the government | शासनाच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचा रस्ता रोको

शासनाच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचा रस्ता रोको

Next
ठळक मुद्देपाच दिवसांत कारवाईची ग्वाही

ऑनलाईन लोकमत 
समुद्रपूर : भारनियमन रद्द करा, कापसाला सात हजार रुपये तर सोयाबीनला पाच हजार रुपये क्विंटल भाव द्या, या मागण्यांसाठी बुधवारी दुपारी १२ वाजता येथील विद्याविकास महाविद्यालय ते झेंडा चौक मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. पाच दिवसांत कार्यवाही करण्याची ग्वाही दिल्याने शेतकरी व मनसेने आंदोलन मागे घेतले.
शेतकºयांच्या समस्यांबाबत एक महिन्यापासून मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती. याबाबत प्रशासनाला इशारा देण्यात आला होता. कृषी पंपाचे भारनियमन १२ ते १६ तास असल्याने शेतकरी त्रस्त आहे. रात्री बेरात्री ओलितासाठी जाणे जीवावर बेतणारे आहे. शेतकºयांच्या जीवितास धोका झाला तर जबाबदार कोण, असा प्रश्न मनसेने आंदोलनात उपस्थित केला. महाराष्ट्रात आणि विशेषत: विदर्भात मोठ्या प्रमाणात विद्युत निर्मिती होते. मग, भारनियमन का, असा प्रश्नही मनसेने मांडला. महावितरणचे अभियंता व तहसीलदार यांनी आंदोलन स्थळी येत आश्वासन दिल्यास आंदोलन मागे घेऊ, अशी भूमिका घेतली. यामुळे उपअभियंता व तहसीलदार यांनी आंदोलनस्थळ गाठत मागण्यांचे समर्थन केले. पाच दिवसाच्या आत हे प्रश्न मार्गी लागतील, अशी ग्वाही दिली. यानंतर रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात अमोल बोरकर, सुभाष चौधरी, मनोज गिरडे, किशोर चांभारे, रमेश घंगारे, प्रवीण श्रीवास्तव, सुनील भुते, राहुल सोरटे, जयंत कातरकर, अनिल आडकीने, वासुदेव वैरागडे, कवडु ब्राह्मणे, अक्षर पठाण, गोविंदा येडे, नत्थूजी गुळघाने, राहुल घुसे, प्रवीण वाघमारे, राजू मते, अनिल क्षीरसागर, निलेश खाटीक, संदीप शिवणकर, प्रदीप बुरिले, बंडु मून, अतुल चंदनखेडे, विष्णू कारामोरे, विशाल जयराज, बंटी जयराज, शुभम पेटकर, विशाल मखरे, प्रविण वाघमारे, सावरकर यासह शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Stop the road for farmers protesting against the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी