भदाडी नदीपात्राच्या खोलीकरण कामास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 11:48 PM2018-02-04T23:48:32+5:302018-02-04T23:49:11+5:30

कमलनयन जमनालाल बजाज फाऊंडेशन, टाटा ट्रस्ट, महाराष्ट्र शासन व लोकसहभाग असे संयुक्त विद्यमाने चिकणी जामणी येथे यशोदा नदी खोरे पुनरूज्जीवन प्रकल्पांतर्गत भदाडी नदी पात्राच्या सरळीकरण, रूंदीकरण व खोलीकरण कामाला प्रारंभ झाला आहे.

Start of opening of Bhadadi river basin | भदाडी नदीपात्राच्या खोलीकरण कामास प्रारंभ

भदाडी नदीपात्राच्या खोलीकरण कामास प्रारंभ

Next
ठळक मुद्देयशोदा नदी खोरे प्रकल्पांतर्गत कामे प्रगतीपथावर : विहिरी तथा भूजल पाणी पातळी वाढून शेतीला लाभ

ऑनलाईन लोकमत
चिकणी (जामणी) : कमलनयन जमनालाल बजाज फाऊंडेशन, टाटा ट्रस्ट, महाराष्ट्र शासन व लोकसहभाग असे संयुक्त विद्यमाने चिकणी जामणी येथे यशोदा नदी खोरे पुनरूज्जीवन प्रकल्पांतर्गत भदाडी नदी पात्राच्या सरळीकरण, रूंदीकरण व खोलीकरण कामाला प्रारंभ झाला आहे.
एक किमी अंतराच्या या कामाचा शुभारंभ चिकणी येथील सरपंच ललीता डफरे, उपसरपंच निलीमा पंधरे, ग्रामविकास अधिकारी जंगम, जलस्त्रोत विकास कार्यक्रम अधिकारी विनोद पारिसे, नवनीत उपाध्याय, चंद्रशेखर मोहिजे, ग्रामसेवक रितेश लाटकर, अभय मून यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी पारिसे यांनी विविध योजना, संस्थेचे कार्य आणि यशोदा नदी खोरे प्रकल्पाच्या महत्त्वाबाबत माहिती विषद केली. भदाडी नदी खोलीकरणाचे काम कमलनयन बजाज फाऊंडेशन, टाटा ट्रस्ट, महाराष्ट्र शासन आणि लोकसहभाग अशा संयुक्त प्रयत्नातून केले जात आहे. नदीलगत असलेल्या शेतीचे तथा काठावरील घरांचे दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे मोठे नुसकान होत होते. नदी पात्राच्या खोलीकरण व रूंदीकरणामुळे हे नुकसान टाळता येणार आहे. शिवाय विहिररींची पाण्याची पातळी वाढणार आहे. भूजल पातळी वाढून सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. पर्यायाने उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे. शिवाय गुरांना पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. पुरामुळे पडिक पडलेली जमीन वाहतीखाली येऊन उत्पन्न घेता येणार आहे. जमिनीची सुपिकता वाढणार असून पर्यायाने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले.
भदाडी नदी पात्राच्या खोलीकरणाचे हे काम एक किमी अंतरात करण्यात येणार आहे. याचा ३१ शेतकऱ्यांना तथा १५१ एकर शेतीला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभ होणार आहे. यापूर्वी चिकणी गावामध्ये एकूण ३ किमी लांबीचे काम करण्यात आले असून याद्वारे ९१ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आलेला आहे. एकूण या कामामुळे ३८५ एकर शेतीला फायदा होणार आहे. लाभक्षेत्रात येणाऱ्या ३५ विहिरींच्या पाण्याची पातळी वाढणार आहे.
सदर यशोदा नदी खोरे प्रकल्प हा जिल्ह्यातील चार तालुक्यांत राबविला जात आहे. यात आर्वी २ गावे, वर्धा ७५ गावे, देवळी ५५ गावे, हिंगणघाट ११ गावे अशा एकूण १४३ गावांमध्ये कामे प्रस्तावित असल्याचेही सांगण्यात आले. कार्यक्रमाला रवी माणिकपुरे, अतुल देशमुख, शेखबाबा देवतळे, नितीन भोयर, नितीन आखुड, अतुल डफरे, दिगांबर वाणी, कमलाकर अलोने, लखन कुंभरे, अंबादास मडकाम, मनोज उईके, रूपेश डायरे, प्रदीप भोयर, विजय डागरे, गजानन मडकाम, झोलबा डायरे, प्रशांत डफरे, राजू तोडाम, दिलीप इंगोले आदींनी सहकार्य केले.
चार तालुक्यांतील १४३ गावांमध्ये कामे प्रस्तावित
यशोदा नदी खोरे पुनरूज्जीवन प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये १४३ गावांमध्ये कामे प्रस्तावित आहेत. यात आर्वी तालुक्यातील दोन, वर्धा ७५, देवळी ५५ व हिंगणघाट ११ अशी गावे समाविष्ट आहेत. सध्या चिकणी जामणी येथील कामे सुरू असून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या १२२ शेतकऱ्यांना व ३८५ एकर शेतीला फायदा मिळणार आहे.

Web Title: Start of opening of Bhadadi river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :riverनदी