दीड महिन्यात सात घरफोड्या करणारे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 10:28 PM2019-07-22T22:28:47+5:302019-07-22T22:29:08+5:30

मागील दीड महिन्याच्या काळात वर्धा शहरातील विविध भागातील सात घरांना टार्गेट करून घरातून रोख व मौल्यवान साहित्य चोरून नेणाऱ्या टोळीतील चार जणांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी रोख ३ हजार रुपये, साडे एकवीस ग्रॅम सोन आणि ११० ग्रॅम चांदी जप्त केली आहे. रामा देवराव देऊळकर (२३), किसना रमेश राऊत (२५), राजू उर्फ काल्या रामा दांडेकर (२६) व मंगेश बाबुलाल गुंजेवार (२४) सर्व रा. बोरगाव (मेघे), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

In seven and a half months, seven burglaries erupted | दीड महिन्यात सात घरफोड्या करणारे गजाआड

दीड महिन्यात सात घरफोड्या करणारे गजाआड

Next
ठळक मुद्देशहर पोलिसांनी ठोकल्या बेड्या : सोन्या-चांदीसह रोख जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील दीड महिन्याच्या काळात वर्धा शहरातील विविध भागातील सात घरांना टार्गेट करून घरातून रोख व मौल्यवान साहित्य चोरून नेणाऱ्या टोळीतील चार जणांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी रोख ३ हजार रुपये, साडे एकवीस ग्रॅम सोन आणि ११० ग्रॅम चांदी जप्त केली आहे. रामा देवराव देऊळकर (२३), किसना रमेश राऊत (२५), राजू उर्फ काल्या रामा दांडेकर (२६) व मंगेश बाबुलाल गुंजेवार (२४) सर्व रा. बोरगाव (मेघे), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
चोरट्यांच्या सात जणांच्या या टोळीतील दोन जण सध्या कारागृहात असून ते चोरीच्या गुन्ह्यात ते न्यायालयीन कोठडी भोगत आहेत. तर शंक उर्फ शंक्या राऊत हा फरार आहे. याच टोळीतील चोरट्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय शेजारील सुनील उमरे यांच्या घरासह देशोन्नती कार्यालयातही चोरी केली होती. विशेष म्हणजे या टोळीतील दोन सदस्य चोरीपूर्वी रेकी करीत तर चोरी करताना तीन जण कुणी येत तर नाही ना या बाबात पाळत ठेवत होते. या चोरट्यांनी चोरीच्या सोन्याच्या दागिण्यांची विल्हेवाट वर्धेतील एका सराफा व्यावसायिकाकडे लावली होती, असे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश पारधी यांच्या मार्गदर्शनात एएसआय दत्तात्रय ठोंबरे, विवेक लोणकर, बाबाराव बोरकुटे, पोलीस शिपाई राजू वैरागडे, सचिन इंगोले, जगदीश चव्हाण, महादेव सानप, अरविंद घुगे, रितेश गुजर, दिनेश राठोड, गितेश देवघरे, सचिन दिक्षीत, पवन निलेकर, विकास मुंडे, गंगाधर चांभारे यांनी केली.
या गुन्ह्याची दिली कबुली
सदर चोरट्यांनी एकूण सात चोरीच्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. परंतु, त्यांच्याकडून अधिक काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. या चोरट्यांनी शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रहिवासी असेलेल्या मदन बाबुराव चतुरकर रा. शिवार्पणनगर नालवाडी, अनुराग रमणलाल बंसल रा. गणेशनगर बोरगाव (मेघे), श्रीरंग मारोतराव वाघमारे रा. भिमनगर, सुनील श्रीरत्न उमरे रा. पोलीस अधीक्षक कार्यालया शेजारी, सिव्हिल लाईन वर्धा, रूपराव विठ्ठल हारगुडे रा. हरिहरनगर वर्धा यांच्या घरी चोरी केली. तर रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आशीष अनिल गाथे रा. धंतोली व बॅचलर रोड वरील देशोन्नती कार्यालयातही चोरी केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे.

Web Title: In seven and a half months, seven burglaries erupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.