अंगणवाडीशेजारील रोहित्राच्या ग्रिप पळविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 10:18 PM2019-05-13T22:18:48+5:302019-05-13T22:19:13+5:30

नजीक च्या वडगाव (जंगली) येथील अंगणवाडी शेजारी असलेल्या रोहित्राच्या सुरक्षा पेटीतून ग्रीप पळविण्यात आल्या आहेत. येथील व्यवस्था सुस्थितीत रहावी याची जबाबदारी लाईनमनची; पण त्याच्याकडूनच दुर्लक्ष करण्यात धन्यता मानली जात असल्याने कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. शिवाय विद्युत पुरवठा वेळोवेळी खंडित होत असून याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

Rohit's grip was caught near Anganwadi | अंगणवाडीशेजारील रोहित्राच्या ग्रिप पळविल्या

अंगणवाडीशेजारील रोहित्राच्या ग्रिप पळविल्या

Next
ठळक मुद्देलाईनमनचे दुर्लक्ष : वारंवार पुरवठा होतो खंडित

लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : नजीक च्या वडगाव (जंगली) येथील अंगणवाडी शेजारी असलेल्या रोहित्राच्या सुरक्षा पेटीतून ग्रीप पळविण्यात आल्या आहेत. येथील व्यवस्था सुस्थितीत रहावी याची जबाबदारी लाईनमनची; पण त्याच्याकडूनच दुर्लक्ष करण्यात धन्यता मानली जात असल्याने कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. शिवाय विद्युत पुरवठा वेळोवेळी खंडित होत असून याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
अंगणवाडीतील बच्चेकंपनी रोहित्राच्या आवारात खेळण्यासाठी जात असल्याने लाईनमनचा मनमर्जी कारभार एखाद्या अनुचित घटनेला आमंत्रण देणारा ठरत आहे. इतकेच नव्हे तर थोडा जरी वादळी वारा आला तर विद्युत पुरवठा खंडित होतो. शिवाय, लाईनमन गावाबाहेर राहत असल्याने रात्री उशीरा वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना काळोखात रात्र काढावी लागते. सदर प्रकरणी योग्य कार्यवाहीसाठी लाईनमनला नागरिकांनी माहिती दिली. परंतु, दुर्लक्ष करण्यात धन्यता मानली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी महावितरणची असेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांची आहे.

Web Title: Rohit's grip was caught near Anganwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.