नदी आटली; विहिरींचीही जलपातळी खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 10:46 PM2019-03-23T22:46:51+5:302019-03-23T22:47:10+5:30

दोन नद्यांच्या संगमावरील देर्डा गाववासी सध्या पाणीसंकटाचा सामना करीत असून शासन व प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. हमदापूरच्या पुढे देर्डा हे गाव असून या ठिकाणी बोर व धामनदीचा संगम झालेला आहे. या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते.

River flows; The water level of the wells decreased | नदी आटली; विहिरींचीही जलपातळी खालावली

नदी आटली; विहिरींचीही जलपातळी खालावली

Next
ठळक मुद्देरखरखत्या उन्हात ग्रामस्थांची पाण्याकरिता भटकंती

संडे अँकर । 
केळझर येथे ग्रा.पं.कडून अत्यल्प पाणीपुरवठा
उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मागील दोन दिवसांपासून गावाला ग्रा.पं.कडून घरगुती नळांना अत्यल्प पाणीपुरवठा होत असल्यामुळे ग्रामस्थांची पाण्याकरिता भटकंती सुरू झाली आहे. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी निवडणुकीत दंग असल्याने गावातील प्राथमिक सोई सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसते. मागील काही वर्षांपासून प्रत्येक उन्हाळ्यात गावकऱ्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नाहीत. नियोजनाअभावी दरवर्षी पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांतून केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : दोन नद्यांच्या संगमावरील देर्डा गाववासी सध्या पाणीसंकटाचा सामना करीत असून शासन व प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
हमदापूरच्या पुढे देर्डा हे गाव असून या ठिकाणी बोर व धामनदीचा संगम झालेला आहे. या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. नदीकाठावरील गावे सुजलाम् सुफलाम् असतात. यावर्षी मात्र हा समज खोटा ठरायला लागला आह. कधी नव्हे, तर या महाशिवरात्रीला नदीत पाणीच नसल्याचे दिसून आले. पाणीटंचाईचे संकेत असल्याचे जाणकारांतून बोेलले जात आहे.
याच नदीच्या काठावर देर्डा गाववासीयांना पाणी पुरवठा करणारी विहीर आहे. या विहिरीची जलपातळी खालावल्याने एक दिवसाआड पाणी गावात नळ योजनेअंतर्गत पुरविल्या जात आहे. यामुळे मार्च महिन्यातच जलसमस्येच्या झळा गावकरी सोसत आहेत.
ग्रामस्थांचे शेती आणि मजुरी हेच व्यवसाय आणि रोजगाराचे साधन आहे. नदीवर जवळपास दहा मोटरपंप असून पºहाटी, तुरी, चणा, गहू आणि चारा अशी पिके शेतकरी घेतात. पण फेब्रुवारीत नदी आटल्याने शेतकरी हवालदिल झाले. पिकांना पुरेसे पाणी मिळाले नाही. चारा नाही. जनावरांच्या पाण्याचा पण प्रश्न शेतकरी व गोपालकांना भेडसावत आहे. वाढत्या पाऱ्यामुळे सर्वत्र रखरख झाल्याने जनावरे चरणार तरी कोठे? नदीकाठावर विहीर असल्याने आतापर्यंत समस्या जाणवली नाही. यावेळी मात्र नदी आटल्याने पाणीसमस्या अधिक बिकट झालेली आहे.

Web Title: River flows; The water level of the wells decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.