श्रद्धेय बाबूजींच्या स्मृतीदिनी आदरांजली व सर्वधर्मीय प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:55 PM2017-11-24T23:55:33+5:302017-11-24T23:56:44+5:30

स्वातंत्र्य संग्राम सेनानी, लोकमत पत्रसमूहाचे संस्थापक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २० व्या स्मृतीदिनी २५ नोव्हेंबरला (शनिवार) सकाळी १० वाजता ....

Respectful Babuji memorial day honors and all-round prayer | श्रद्धेय बाबूजींच्या स्मृतीदिनी आदरांजली व सर्वधर्मीय प्रार्थना

श्रद्धेय बाबूजींच्या स्मृतीदिनी आदरांजली व सर्वधर्मीय प्रार्थना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्वातंत्र्य संग्राम सेनानी, लोकमत पत्रसमूहाचे संस्थापक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २० व्या स्मृतीदिनी २५ नोव्हेंबरला (शनिवार) सकाळी १० वाजता पवनार येथील बाबूजीवाडीत श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
बाबूजी वाडीतील संकल्पस्थळी संत सयाजी महाराज, रामराव माहुरे महाराज, गुरुदेव प्रचारक बाळकृष्ण हांडे यांच्या उपस्थितीत श्रद्धेय बाबूजींना आदरांजली व सर्वधर्मीय प्रार्थना होईल. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल. या कार्यक्रमाला चाहत्यांसह लोकमत समूहाच्या एजंट, वार्ताहर, सखी मंच सदस्य आणि मित्र परिवाराने उपस्थित राहण्याची विनंती ज्येष्ठ पत्रकार विनोद चोरडिया यांनी केली आहे.

Web Title: Respectful Babuji memorial day honors and all-round prayer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.