Wardha: वर्ध्याचे जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघचालक जेठानंद राजपूत यांना मारहाण

By चैतन्य जोशी | Published: June 26, 2023 12:53 AM2023-06-26T00:53:58+5:302023-06-26T00:56:23+5:30

Wardha News: वर्ध्यावरून बसने प्रवास करीत असताना बसमधल्या युवकांनी हिंगणघाटच्या नांदगाव चौरस्त्यावर खाली उतरवित वर्धा जिल्हा संघ चालक जेठानंद राजपूत यांना मारहाण करण्यात आली.

Rashtriya Swayamsevak Sangh Wardha District Sanghchalak Jethanand Rajput beaten up by mob | Wardha: वर्ध्याचे जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघचालक जेठानंद राजपूत यांना मारहाण

Wardha: वर्ध्याचे जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघचालक जेठानंद राजपूत यांना मारहाण

googlenewsNext

- चैतन्य जोशी 
वर्धा :  वर्ध्यावरून बसने प्रवास करीत असताना बसमधल्या युवकांनी हिंगणघाटच्या नांदगाव चौरस्त्यावर खाली उतरवित वर्धा जिल्हा संघ चालक जेठानंद राजपूत यांना मारहाण करण्यात आली.

जेठानंद राजपूत हे वर्ध्यावरून बसने हिंगणघाटकडे प्रवास करीत होते. बसमध्ये एका दम्पत्याचा वाद सुरु असताना जेठानंद राजपूत हे मध्यस्ती गेले असता वादातील संबंधित  युवकांने शिवीगाळ केली आणि त्याच्या मित्रांना नांदगाव येथे बोलावले. नांदगाव येथे बस थांबवून जेठानंद राजपूत यांना बसखाली उतरवून ८ ते १० जणांनी मारहाण केल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी   हिंगणघाट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरतात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पोलीस ठाण्यावर धाव घेतली.

पोलिसांची कुमक दाखल 
 घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी हिंगणघाट पोलीस ठाणे गाठून  संपूर्ण घटनेचा आढावा घेत आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या. हिंगणघाट शहरात एसआरपी  तसेच पोलिसांची कुमक दाखल झालेली आहे.

शहरात तणावपूर्ण वातावरण 
 घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताचं शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी परिस्थिती हाताळून घेत  संबंधितांना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याने शहरातील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Web Title: Rashtriya Swayamsevak Sangh Wardha District Sanghchalak Jethanand Rajput beaten up by mob

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.