वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 12:08 AM2019-06-03T00:08:48+5:302019-06-03T00:09:48+5:30

शनिवारी रात्री परिसरात वादळीवाºयासह पाऊस झाला. या वादळीवाºयाचा तालुक्यातील सास्ताबाद व नुरापूर गावाला चांगलाच फटका बसला आहे. या गावातील अनेक घरांवरील टिनपत्रे उडाली असून तब्बल ७१ घरांचे नुकसान झाले आहे.

Rainfall with stormy winds | वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

Next
ठळक मुद्देघरांवरील टिनपत्रे उडाली : सास्ताबाद व नुरापूर गावातील ७१ घरांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : शनिवारी रात्री परिसरात वादळीवाºयासह पाऊस झाला. या वादळीवाºयाचा तालुक्यातील सास्ताबाद व नुरापूर गावाला चांगलाच फटका बसला आहे. या गावातील अनेक घरांवरील टिनपत्रे उडाली असून तब्बल ७१ घरांचे नुकसान झाले आहे. एकूणच शनिवारी झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे अनेकांचे संसारच उघड्यावर आले असून त्यांना तातडीने शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.
वादळी वाºयामुळे तालुक्यातील सास्ताबाद व नुरापूर या दोन गावांतील ७१ घरांचे नुकसान झाले आहे. शिवाय अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. तर अशीच परिस्थिती सावली (सास्ताबाद) आणि जामनी शिवारात आहे. सूर्यनारायण मावळतीला गेल्यानंतर अचानक आकाशात मेघ दाटून आले. दरम्यान विजेच्या कडकडाटात सोसाट्याचा वारा सुटला. वाºयाचा वेग इतका जास्त होता की अनेकांच्या घरातील टिनपत्रे उडाली. विशेष म्हणजे, काहींच्या घरावरील उडालेली टिनपत्रे सुमारे दीड किमी अंतरावर जाऊन पडली होती. तर काहीच्या घरावरील टिनपत्रे विद्युत खांबावर तसेच झाडांवर अडकली. शिवाय काही मोठाली झाडेही उन्मळून पडली. या वादळी वाºयामुळे झालेल्या पडझडीत एक मुलगा, बैल आणि गाय जखमी झाले.
नुकसानीचा पंचनामा करणे सुरूच
प्रशासनाने गावातील घरांच्या नुकसानीचा पंचनामा केला आहे. असे असले तरी शेत शिवारात काय नुकसान झाले याचा पंचनामा करणे अद्यापही शिल्लक आहे. सास्ताबाद येथील निळकंठ क्षीरसागर, रत्नपाल कांबळे, बापूराव कांबळे, राजू मेंढे, नागो कांबळे, चरणदास कांबळे, विनोद मेंढे, किशोर मेंढे, त्र्यंबक पाटील, नंदा पाटील, बाबा हाडके, भीमराव हाडके, अमोल हाडके, सुरेश हाडके, राहुल हाडके, दामोधर शंभरकर, दौलत भस्मे, अजय भस्मे, उत्तम शंभरकर, विजय भस्मे, देवराव भस्मे, प्रकाश वरखडे, देविदास वरखडे, विशाल क्षीरसागर, हेमराज भलारकर, प्रकाश वरखडे, विनायक ठाकरे, गणेश मेंढे, गजानन वरखडे, कवजी बिरे, दिवाकर कोकाटे, सुभाष चौधरी, मनोहर चौधरी, कैलास चौधरी, सुरेश चौधरी, अनिल मुगभाते, शरद वेले, पुष्पा धोबे, अरुण बुरघाटे, नारायण चावरे, भालेराव येरकुडे, अजय क्षीरसागर, सुभाष क्षीरसागर, संजय क्षीरसागर, मोहन चावरे, ज्ञानेश्वर वेले, उमा देशमुख, पंढरी पाटेकर, विश्वेश्वर चौधरी, गजानन डोळस्कर, पांडुरंग उमरे, सुरेश डोळस्कर, आशीष हिवंज, चेतन हिवंज तर नुरापूर येथील नाना गजभिये, प्रशांत गजभीये, प्रकाश गजभिये, चिंतामण चौधरी, राजू डेकाटे, राजू चौधरी, शंतनू मशानकर, दिलीप चौधरी, अतूल चौधरी, कुशाल देशमुख, प्रशांत धोटे, शालिक चौधरी, मनोज खंडाते, माणिक कावळे, सुनील चौधरी, अशोक धोटे, किसन चौधरी यांच्या घराचे नुकसान झाल्याची नोंद अधिकाऱ्यांनी घेतली आहे.
सास्ताबाद ५४, तर नुरापुरातील १७ घरांवरील उडाले छप्पर
शनिवारी आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे सास्ताबाद येथील ५४ तर नुरापूरच्या १७ ग्रामस्थांच्या घरावरील छप्पर उडाली आहेत. तर अंगावर वीट पडल्याने देविदास वरखडे यांच्याकडे पाहुणपणाला आलेला साहिल सुनील बाभूळकर हा जखमी झाला. तर नामदेव वरखडे यांच्या मालकीचा बैल आणि गजानन राऊत, अतुल बिरे आणि बंडू कुमरे यांच्या मालकीच्या गाईच्या अंगावर टिनपत्रा पडल्याने त्या जखमी झाल्या.
वादळीवाºयासह पावसामुळे अनेकांचे संसारच उघड्यावर आले आहेत. सुमारे १५ मिनीटांच्या या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांच्या घरातील संसारोपयोगी सहित्याची नासाडी झाली. घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार विजय पवार, मंडळ अधिकारी गजानन मसाळे, तलाठी संजय कपूर, ग्रामसेवक सुधीर राठोड, कोतवाल गजानन खातदेव यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
आमदारांनी केली पाहणी
घटनेची माहिती मिळताच आमदार समीर कुणावार यांनी सास्ताबाद हे गाव गाठून नुकसानग्रस्त परिसराची पाहणी केली. शिवाय तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या, अशा सूचना तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
विद्युत पुरवठा खंडित
अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक भागातील विद्युत तारांच तुटल्या. परिणामी, या भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला. शिवाय तुटलेल्या विद्युत तारा रस्त्यावरच पडून राहिल्याने ग्रामस्थांना रात्र काळोखातच काढावी लागली. महावितरणने दुरूस्तीचे काम हाती घेतले असून महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

Web Title: Rainfall with stormy winds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस