रेल्वे स्थानकाचा फलाट प्रवासी निवाऱ्याविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 11:10 PM2018-09-17T23:10:29+5:302018-09-17T23:10:50+5:30

येथील रेल्वे स्थानकांच्या फलाट क्रमांक २ वर यात्री शेडचे काम सुरू न झाल्याने प्रवाशांना पाऊस व उन्हात थांबावे लागत आहे. यामुळे रेल्वे प्रवाश्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

The railway station's traveler without a traveler | रेल्वे स्थानकाचा फलाट प्रवासी निवाऱ्याविना

रेल्वे स्थानकाचा फलाट प्रवासी निवाऱ्याविना

Next
ठळक मुद्देनव्या ओव्हर ब्रीजचे काम पूर्ण : पावसात थांबतात प्रवाशी

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : येथील रेल्वे स्थानकांच्या फलाट क्रमांक २ वर यात्री शेडचे काम सुरू न झाल्याने प्रवाशांना पाऊस व उन्हात थांबावे लागत आहे. यामुळे रेल्वे प्रवाश्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
हिंगणघाट रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक १ आणि २ वरील प्रवाश्यांना रेल्वे पार करण्यासाठी पायदळ मार्ग म्हणून नव्याने ओव्हर ब्रीज बनविण्यात आला आहे. जुना पुल तोडून रेल्वेच्या तिसऱ्या मार्गाचे रूंदीकरण लक्षात घेवून नवीन अधिक लांबीचा हा नवीन पुल पादचाºयांना ये-जा करण्याकरिता नुकताच तयार करण्यात आला. नवीन पुल उभारण्याकरिता तेथे असलेल्या रेल्वेच्या प्रवाशी शेडला काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे तेव्हापासून फलाट क्रमांक २ वर प्रवासी निवारा राहिलेला नाही. रेल्वे प्रशासनाने ओव्हर ब्रिज बांधताना प्रवासी निवारा सुद्धा बांधण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही प्रवासी निवाºयाचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे प्रवाश्यांना विनाकारण ऊन, पावसाचा त्रास सहन करावा लागत आहे.
या स्थानकावर ये-जा करण्याची संख्या बरीच मोठी आहे. वर्धा-चंद्रपूर या दरम्यानचे हे मोठे रेल्वे स्थानक आहे. येथे ८ गाड्यांना स्टॉपेज असून प्रवाशांची गर्दी असते. पावसाने केव्हाही हजेरी लावल्यास प्रवाशांना अचानकरित्या आसरा घेण्यासाठी पायऱ्यांचा पुल ओलांडून लगबगीने फलाट क्र. १ वर जाणे अत्यंत अवघड ठरते. त्यामुळे ओले होण्याशिवाय पर्याय उरत नाही. अलिकडे दुपारी उन्हाचा तडाखाही सुरू झाला असून या गर्मीत दुपारी विना शेडने उभे राहावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाश्यांनी केली आहे.
या प्रश्नावर विभागीय रेल्वे प्रशासना आपचे प्रमोद जुमडे, मनोज रूपारेल यांनी तक्रार केली आहे.परंतु अजूनपर्यंत याबाबत कुठलीही कार्यवाही झालेली नाही त्यामुळे प्रवाशांचा त्रास वाढत आहे. यावर तोडगा काढावा अशी मागणी आहे.

Web Title: The railway station's traveler without a traveler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.