प्रधान पोस्ट आॅफिससमोर डाकसेवकांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 11:47 PM2018-05-23T23:47:34+5:302018-05-23T23:47:34+5:30

आॅल इंडिया ग्रामीण डाकसेवक युनियनच्यावतीने २२ मे पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. स्थानिक प्रधान डाकघरासमोर आंदोलनकर्ते कर्मचाऱ्यांनी बुधवारी ठिय्या देत विविध मागण्या तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली. तसे निवेदनही यावेळी संबंधितांना देण्यात आले.

 Posting stops in front of the Prime Post Office | प्रधान पोस्ट आॅफिससमोर डाकसेवकांचा ठिय्या

प्रधान पोस्ट आॅफिससमोर डाकसेवकांचा ठिय्या

Next
ठळक मुद्देसेवा विस्कळीत : प्रलंबित मागण्या तात्काळ निकाली काढण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आॅल इंडिया ग्रामीण डाकसेवक युनियनच्यावतीने २२ मे पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. स्थानिक प्रधान डाकघरासमोर आंदोलनकर्ते कर्मचाऱ्यांनी बुधवारी ठिय्या देत विविध मागण्या तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली. तसे निवेदनही यावेळी संबंधितांना देण्यात आले.
ग्रामीण डाकसेवकांच्या विविध मागण्या गत अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्या तात्काळ निकाली काढण्यात याव्या यासाठी संबंधितांना वेळोवेळी निवेदन देण्यात आली. परंतु, संबंधितांनी त्या निकाली काढण्याकडे दुर्लक्षच करण्यात धन्यता मानली. मार्च २०१८ मध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर धरणे देण्यात आले. त्यानंतर कॅबिनेटकडे नोट पाठविण्यात आली. परंतु, एप्रिल २०१८ पासून ही फाईल अर्थमंत्रालयात पडून आहे. त्यानंतर २ मे रोजी संयुक्त बैठक घेण्यात आली व त्यात संप करण्याचे ठरविण्यात आले. सरकारने प्रलंबित मागण्यांवर तात्काळ विचार करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. वर्धा येथील प्रधान डाकघरासमोर बुधवारी करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनात राजेंद्र टिकाईत, सुधाकर बढीये, सलीम पठाण, राजू डंभारे, पंजाब फटींग, के. एल. व्यापारी, चंदू बेदरकार यांच्यासह ग्रामीण डाक सेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या आहेत प्रलंबित मागण्या
डॉ. कमलेशचंद्र कमेटीच्या सर्व सकारात्मक शिफारशी त्वरीत लागू कराव्यात.
जी. डी. एस. कमेटीच्या शिफारशी एआयजीडीएस युनियनने सुचविलेल्या दुरूस्त्यांसह त्वरीत लागू कराव्यात.
सर्व ग्रामीण डाक सेवकांना आठ तास काम देवून त्यांना विभागीय कर्मचाऱ्यांचा हुद्दा प्रदान करावा.
केंद्रीय कॅट व मद्रास कॅटच्या निर्णयानुसार जी.डी.एस. कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करावी.
सर्व जी.डी.एस. कर्मचाऱ्यांना ५ लाख रूपये ग्रॅज्युएटी कॅटप्रमाणे देण्यात यावे.
विविध टारगेटच्या नावाखाली होणारा ग्रामीण डाकसेवक कर्मचाऱ्यांचा छळ थांबविण्यात यावा.

Web Title:  Posting stops in front of the Prime Post Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.