मेहनतीच्या जोरावर फुलविली सेंद्रिय पद्धतीने डाळिंबाची बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 10:32 PM2019-07-16T22:32:47+5:302019-07-16T22:33:24+5:30

वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना यंदा तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोयाव्या लागत आहे. परंतु, याच पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा काटकसरीने आणि योग्य पद्धतीने वापर करून मेहनतीच्या जोरावर एका शेतकºयाने सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून डाळींबाची बाग फुलविली. शिवाय बºयापैकी उत्पन्नही घेतले. विशेष म्हणजे या शेतकºयाला नांदी फाऊंडेशनचे सहकार्य लाभले.

Pomegranate garden with floral organic method | मेहनतीच्या जोरावर फुलविली सेंद्रिय पद्धतीने डाळिंबाची बाग

मेहनतीच्या जोरावर फुलविली सेंद्रिय पद्धतीने डाळिंबाची बाग

googlenewsNext
ठळक मुद्देध्येयवेड्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग : नांदी फाऊंडेशनचे लाभले सहकार्य

विनोद घोडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना यंदा तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोयाव्या लागत आहे. परंतु, याच पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा काटकसरीने आणि योग्य पद्धतीने वापर करून मेहनतीच्या जोरावर एका शेतकºयाने सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून डाळींबाची बाग फुलविली. शिवाय बºयापैकी उत्पन्नही घेतले. विशेष म्हणजे या शेतकºयाला नांदी फाऊंडेशनचे सहकार्य लाभले.
केळापुर येथील शेतकरी वंदन नारायण जाधव यांनी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून डाळिंबाची बाग फुलविली आहे. शिवाय सध्या भरघोस फळानी ही बाग बहरली आहे. शेतकरी वंदन जाधव यांच्याकडे ५ एकर ओलिताची शेती आहे. त्यांनी दोन एकर शेतात नांदी फाऊंडेशनच्यावतीने २०१५-१६ साली डाळिंबाच्या झाडांची लागवड केली. तसेच दोन एकर शेतातील डाळींब झाडांची दोन विभागामध्ये विभागणी केली. एक एकर शेतातील झाडे अंबीया बहरा करीता तर एक एकर शेतातील झाडे मृग बहराकरिता तयार करण्यात आले. अंबीया बहराचे डाळींब फळ तोडण्या योग्य झाले आहेत. तर मृग बहराच्या झाडांची पाहणी केल्यावर फळ कळी धरण्याच्या अवस्थेत असल्याचे दिसते. फळाच्या वजनाने काही झाडे वाकली आहेत. एका झाडाला किमान ३०-४० फळ आहेत. तर एका फळाचे वजन २०० ते ४०० ग्रॅम पर्यंत आहेत. सेंद्रिय डाळींबाना बाजार पेठेत अधिक प्रमाणात मागणी आहे. उत्पन्न घेण्याची पहिलीच वेळ असल्यामुळे नक्की उत्पन्न किती होईल, हे सांगणे कठीण असल्याचे शेतकरी सांगतो.
सरासरी १०० रुपये भाव मिळण्याची अपेक्षा
बाजार भावा नुसार १५० ग्रॅम वजनाचे डाळींब प्रतिकिलो ६० रूपये प्रमाणे आहेत. तर २०० ग्रॅमचेवर ८० रूपये, आणि ३०० ग्रॅम वजनच्या वर प्रतिकिलो १२० रूपयेप्रमाणे आहेत. इतकेच नव्हे, तर सरासरी १०० रुपये भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकºयाला आहे.

रासायनिक खतांचा वापर नाहीच
या डाळीबांच्या बागेमध्ये सुरूवातीपासून आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे रासायनिक खत किंवा औषधी वापरण्यात आली नाही. गरज भासल्यावर सेंद्रिय खत देत औषधांची फवारणी करण्यात आली.
धुऱ्यावर शेवग्याची झाडे
रासायनिक शेतीचा प्रार्दुभाव डाळिंबाच्या झाडांवर होऊ नये याकरिता धुºयावर शेवगाची झाडे लावण्यता आली. यामुळे डाळिंबाच्या झाडांना वादळाचा पाहिजे तसा फटका सहन करावा लागत नाही. शिवाय काही प्रमाणात उष्ण तापमानाचा प्रभाव कमी करता येत असल्याचे शेतकरी सांगतो. या शेतकºयाचा हा यशस्वी प्रयोग इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा ठरत आहे. विशेष म्हणजे, शैलेंद्र डेचेलवार, प्रकाश चावळे, पुरूषोत्तम मुंजेवार, संदीप चावक, दत्ता महाजन, कुलदीप बैस, सूर्यकांत बोरकर यांनीही सेंद्रिय पद्धतीने डाळिंबाची बाग तयार केल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Pomegranate garden with floral organic method

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.