वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातील ८० गावे होणार सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 09:57 PM2019-01-22T21:57:18+5:302019-01-22T21:57:37+5:30

पाणी फाऊंडेशनच्या २०१८-१९ या वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातील ८० गावे सहभागी होणार आहेत. पहिल्या टप्प्यात या गावांमध्ये ग्रामस्थांना एकत्रिपणे प्रशिक्षण दिले जाणार आहे. २०१६-१७ मध्ये वाटर कप स्पर्धेत आर्वी तालुक्यातील काकडधरा या गावाने राज्यात प्रथम येत ५० लाखांचे बक्षीस प्राप्त केले होते, हे विशेष.

Participants will participate in 80 villages in the water cup competition | वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातील ८० गावे होणार सहभागी

वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातील ८० गावे होणार सहभागी

Next
ठळक मुद्देपाणी फाऊंडेशनचा उपक्रम

सुरेंद्र डाफ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : पाणी फाऊंडेशनच्या २०१८-१९ या वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातील ८० गावे सहभागी होणार आहेत. पहिल्या टप्प्यात या गावांमध्ये ग्रामस्थांना एकत्रिपणे प्रशिक्षण दिले जाणार आहे. २०१६-१७ मध्ये वाटर कप स्पर्धेत आर्वी तालुक्यातील काकडधरा या गावाने राज्यात प्रथम येत ५० लाखांचे बक्षीस प्राप्त केले होते, हे विशेष.
सन २०१७-१८ या वर्षाच्या वाटर कप स्पर्धेत तालुक्यातील वाई या गावाने जिल्ह्यातून प्रथम येत १५ लाखांचे बक्षीस जिंकले होते. त्यासाठी या गावाने एक लाख २५ हजार घनमिटरचे मशीनने काम करून ४५०० घनमिटर श्रमदान केले होते. बोदड या गावाने ९५ हजार घनमीटरचे मशीन काम करून पाच हजार ६०० घनमीटर श्रमदान केले. शिवाय ४ लाखांचे दुसरे बक्षीस प्राप्त केले. हिवरा या गावाने ५५ हजार घनमिटरचे मशीन काम केले असून ४ हजार २०० घनमिटर श्रमदान करून तिसरे बक्षीस मिळविले होते. यात तालुक्यातील कंचनपूर, टेंभरी, परसोडी, खैरी, सालधरा, काचनूर, चोरांबा, गौरखेडा, खुबगांव या गावांनीही उत्कृष्ट काम केली. २०१८-१९ या वर्षात वाटर कप स्पर्धेत तालुक्यातील बोदड, तळेगांव (रघुजी) वाई, मिर्झापूर, तरोड, टाकरखेडा, सुकळी (उबार) इठलापूर, सर्कसपूर, नांदपूर, आजनगांव, पानवाडी, पिपंळगाव, पिंपळखुटा खुबगांव, बेनोडा, माटोडा, धनोडी, एकलारा, देऊरवाडा, टोणा, बारवाडा, चोंडी, हरदोली, परसोडी, टेंभरी, सावरखेडा, टाकळी, पांजरा, चोरांबा, गौरखेडा, वर्धामनेरी, पाचेगांव, वडगाव, दिघी, सायखेडा, हुसेनपूर, रामपूर, बोरी, सोनेगाव, बेढोणा, मांडला, खानवाडी, उमरी (सु.), किन्हाळा, सुकळी, चांदणी, हिवरा, हिवरा (तांडा), जामरपुरा, राजनी, हर्रासी, कवाडी पारगोठाण रोहणा, राजापूर, कर्माबाद, कासरखेडा, सावद, मदना, बोरखेडी, खरांगणा, मोरांगणा, दहेगांव (मु.), काचनूर, सहेली, बिटपूर, बेल्हारा, माळेगाव (ठेका), सालधरा, काकडधरा, सावळापूर, कृष्णापूर, कोपर, दहेगांव (गोंडी), बेढोणा, भादोड, शिरपूर (बोके), खडकी आदी गावे सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Participants will participate in 80 villages in the water cup competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.