न.प. कडून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 09:32 PM2018-09-19T21:32:15+5:302018-09-19T21:32:31+5:30

नगर परिषदेने २००६--०७ ला केलेल्या कर आकारणी प्रमाणेच कर वसूली करावी व नवीन कर आकारणी म्हणजे २०१२--१३ प्रमाणे दिलेल्या कर वसूली नोटिस प्रमाणे कर वसुली करू नये असा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने २० जुलै २०१५ ला दिलेला असतांनाही नप सरसकटपणे २०१२-१३ प्रमाणे कर वसूली करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करीत आहे. या बाबत जनतेने जुन्या पद्धतीने कर भरणी करावी, असे आवाहन माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी केले आहे.

N.P. Violation of the Supreme Court order | न.प. कडून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन

न.प. कडून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन

Next
ठळक मुद्देमालमत्तेच्या कराची वसूली २००६-०७ प्रमाणे करा : सुधीर कोठारी यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : नगर परिषदेने २००६--०७ ला केलेल्या कर आकारणी प्रमाणेच कर वसूली करावी व नवीन कर आकारणी म्हणजे २०१२--१३ प्रमाणे दिलेल्या कर वसूली नोटिस प्रमाणे कर वसुली करू नये असा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने २० जुलै २०१५ ला दिलेला असतांनाही नप सरसकटपणे २०१२-१३ प्रमाणे कर वसूली करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करीत आहे. या बाबत जनतेने जुन्या पद्धतीने कर भरणी करावी, असे आवाहन माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी केले आहे.
या बाबत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अ‍ॅड. कोठारी म्हणाले की, नगर परिषद शहरातील मालमत्तेवर दर चार वर्षांनी कर आकारणी करीत असते. सन २००६--०७ -२००९--१० या चार वर्षासाठी पालिकेने मालमत्ता कराची आकारणी केलेली होती. परंतु नंतर २०१०-१२ या वर्षांत नवीन कर आकारणी न झाल्यामुळे २०१२-१३ ची कर आकारणी २०१६ -१७ ते २०१८-१९ मध्ये कायम राहिली. व नगर पालिका त्या नुसारच कर आकारणी करीत आहे. सन २०१२-१३ मध्ये केलेल्या कर आकारणी विरोधात येथील संदीप इंदरचंद गांधी, व आरती प्रदीप हरणे नागपुर खंडपीठात सदर करआकारणी विरोधात दाद मागितली. व ही कर आकारणी रद्द करण्यात आली. नगर पालिका सदर आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात गेली. सर्वोच्च न्यायालयाने २०जूलै २०१५ ला एक आदेश देऊन पालिकेने सन २००६-०७ या जुन्या दराप्रमानेच कर आकारणी करावी व वसूली करावी असे आदेश दिले. २०१२-१३ प्रमाणे कर वसुली करू शकणार नाही असा स्पष्ट आदेश दिला. मात्र पालिका सरसकट २०१२-१३ प्रमाणे कर वसूली करीत असल्याने या अन्यायकारी कर वसुलीचा फटका सर्वांनाच बसत असल्याचा आरोप अ‍ॅड. कोठारी यांनी केला.
सर्व समविचारी लोकांना सोबत घेऊन या विरोधात आंदोलन करणार आहे. जनतेला याबाबत कोणती समस्या असेल तर त्यांना संपूर्ण कायदेशीर मदत पुरविणार असल्याचे अ‍ॅड. कोठारी यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक आफताब खान, अशोक रामटेके, माजी नप अध्यक्ष सुरेश मुंजेवार, हिंमत चतुर, धनंजय बकाणे, प्रकाश राऊत आदी उपस्थित होते

Web Title: N.P. Violation of the Supreme Court order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.