Lok Sabha Election 2019; रणरणत उन्ह; कार्यकर्त्यांनी घ्यावी काळजी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 09:38 PM2019-04-04T21:38:04+5:302019-04-04T21:38:41+5:30

वर्धा लोकसभा मतदार संघात रणसंग्राम तापत असताना सूर्यही आग ओकायला लागला आहे. तरी सर्व मतदारांपर्यंत अल्पकालावधीत पोहोचण्याकरिता नेत्यांसह कार्यकर्ते दिवसरात्र पळत आहे. सध्यात वर्ध्यातील तापमान चाळीशीपार गेल्याने येत्या दिवसात ते आणखीच वाढण्याची आहे.

Lok Sabha Election 2019; Workers need to take care? | Lok Sabha Election 2019; रणरणत उन्ह; कार्यकर्त्यांनी घ्यावी काळजी?

Lok Sabha Election 2019; रणरणत उन्ह; कार्यकर्त्यांनी घ्यावी काळजी?

Next
ठळक मुद्देसूर्य आग ओकतोय अन् प्रचाराचा पाराही चढलाय : डॉक्टरांचा सल्ला : पाणी प्या, बाहेरचे खाणे टाळा

आनंद इंगोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा लोकसभा मतदार संघात रणसंग्राम तापत असताना सूर्यही आग ओकायला लागला आहे. तरी सर्व मतदारांपर्यंत अल्पकालावधीत पोहोचण्याकरिता नेत्यांसह कार्यकर्ते दिवसरात्र पळत आहे. सध्यात वर्ध्यातील तापमान चाळीशीपार गेल्याने येत्या दिवसात ते आणखीच वाढण्याची आहे. त्यामुळे प्रचारासोबतच आता उमेदवारांसह कार्यकर्त्यांना प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार आहे.
वर्धा लोकसभा मतदार संघात वर्धा जिल्ह्यातील आर्वी, देवळी, हिंगणघाट, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील धामणगांव (रेल्वे) व मोर्शी अशा सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. लोकसभा क्षेत्राचा तब्बल ६ हजार ३२३ चौरस किलोमीटर इतक आवाका आहे. तसेच २३४ किलोमीटरच्या परिघात हा मतदार संघ येत असून यामध्ये यावर्षीच्या मतदार नोंदणीनुसार १७ लाख ४२ हजार ४५० मतदार आहे.
निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांचे तीन, नोंदणीकृत राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांचे सात तर अपक्ष म्हणून चार उमेदवार रिंगणात आहे. येत्या ११ एप्रिल रोजी मतदान होणार असून उमेदवारांना प्रचाराकरिता केवळ १२ दिवसांचा कालावधी मिळाल्याने उमेदवारांनी प्रचार यंत्रणा सक्रीय केल्याचे दिसते. कार्यकर्तेही कामाला लागले आहे. या दरम्यान नेत्यांच्या सभाही होत आहेत. आता केवळ पाच दिवस प्रचारासाठी शिल्लक राहिल्याने कार्यकर्ते व पदाधिकारी तपत्या उन्हाची तमा न बाळगता आपला उमेदवार इतर उमेदवारांच्या तुलनेत कसा वेगळा आहे, हे पटवून देताना दिसत आहेत.
सोबतच सूर्याचा पाराही दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आता उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी या तापत्या उन्हापासून आपल्या प्रकृतीचाही बचाव करण्याची गरज आहे. प्रकृती जर सांभाळली नाही तर येत्या दिवसात उमेदवारांना सूर्यनारायणाच्या कोपालाही समोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काळजी घेतलेली बरी.
तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता
विदर्भातील तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. विदर्भातील उष्णतेची ही लाट तीव्र होऊन ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून वर्तविण्यात आली आहे.
तसेच याच दिवसांमध्ये गारपीटाचीही शक्यता वर्तविण्यात आली असून वातावरणातील बदलाचा परिणाम प्रचारावरही पडण्याची शक्यता आहे. होणाऱ्या प्रचारसभा, गावागावातील प्रचार यावरच उष्णेतेसह गारपीटाचाही परिणाम जाणविण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यातील नागरिकांना दुष्काळाच्या झळाही सासाव्या लागत आहेत.
हे कराल तर वाचाल?
1. पुरेसे पाणी घ्या, प्रवासात पाणी सोबत ठेवा, हलक्या वजनाचे फिक्कट रंगाचे सैल कपडे वापरा, उन्हात गॉगल, छत्री व पादत्राणे वापरा,उन्हा जाताना टोपी/ हॅट खाली ओलसर कपडा ठेवा.
2. घराला ओलसर पडदे,पंखा, कूलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा, पहाटेच्यावेळी आणि सायंकाळी जास्तीत जास्त प्रचार कामे आटोपावी, दुपारी घराबाहेर पडणे टाळावे,
3. प्रचाराला जात असताना उन्हात कष्टाची कामे करणे टाळावी, पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठे ऊ नये, मद्य, चहा, कॉफी व सॉप्ट ड्रिंक्स टाळा, खुप प्रथिन युक्त अन्न आणि शिळे अन्न खाणे टाळा.

Web Title: Lok Sabha Election 2019; Workers need to take care?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.