शंभर वर्षे झालेल्या वृक्षांची केली कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 11:31 PM2019-05-07T23:31:07+5:302019-05-07T23:33:57+5:30

वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करा, तेच आपल्याला तारतील असे सांगितल्या जाते. शिवाय सध्या शासन स्तरावर वृक्षारोपण करून वृक्षाचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले जात आहे. असे असताना येथील आठवडी बाजारातील १०० वर्ष जुने व डेरेदार वृक्षांची कत्तर करण्याचा सपाटा लावण्यात आल्याने नगरपंचायत प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्न उपस्थित केले जात आहे.

Kultur kills the trees for a hundred years | शंभर वर्षे झालेल्या वृक्षांची केली कत्तल

शंभर वर्षे झालेल्या वृक्षांची केली कत्तल

Next
ठळक मुद्देआठवडी बाजारातील प्रकार : वृक्षसंवर्धनाला मिळतोय खो

सुधीर खडसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करा, तेच आपल्याला तारतील असे सांगितल्या जाते. शिवाय सध्या शासन स्तरावर वृक्षारोपण करून वृक्षाचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले जात आहे. असे असताना येथील आठवडी बाजारातील १०० वर्ष जुने व डेरेदार वृक्षांची कत्तर करण्याचा सपाटा लावण्यात आल्याने नगरपंचायत प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्न उपस्थित केले जात आहे.
विकास कामात अडथळा येत असल्याचे कारण पुढे करीत डेरेदार वृक्षांची कत्तलच करण्यास सुरूवात केली आहे. याचा प्रत्यय आठवडी बाजारात दिसून आला. तेथील वृक्ष तोडण्याचा ठराव ४ आॅगस्ट २०१८ ला झाला; पण १० आॅगस्टला हे काम १५ दिवसात पूर्ण करण्याच्या अटीवर वर्कआॅडर करण्यात आला. मात्र, मंगळवारी ही झाड तोडण्यात आल्याने नगरपंचायतीच्या कार्यप्रणालीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने तापमानातही भरमसाठ वाढ होत आहे. शिवाय वृक्षसंवर्धनाच्या उद्देशालाही बगल मिळत आहे. यापूर्वी स्थानिक विद्या विकास महाविद्यालय ते तहसील कार्यालयादरम्यानची सुमारे ४० वृक्ष तोडण्यात आली आहे. ही वृक्ष दीडशे वर्ष जुनी होती. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड करून स्थानिक नगरपंचायत प्रशासन आपल्या तुगलकी कारभाराचाच परिचय देत असल्याची चर्चा सध्या शहरात होत आहे.
उडाली शाब्दिक चकमक
वृक्षतोड केली जात असल्याची माहिती मिळताच मधुकर कामडी, आशिष अंड्रस्कर, दिनेश निखाडे, अशोक डगावर, सचिन तुळणकर, सौरभ साळवे, सुमित जीवतोडे यांनी घटनास्थळ गाठले. शिवाय काम थांबविण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर प्रशासकीय अधिकारी जगताप यांनी बुडापासुन तोडलेल्या झाडांचा पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी सादर केला. यावेळी नगरसेवक प्रविण चौधरी, दिनेश निखाडे, व अशोक डगवार यांच्यात शाब्दीक चकमक उडाली.
फांद्या तोडण्याच्याच सूचना
निर्गमित करण्यात आलेल्या त्या आदेशात केवळ झाडाच्या फांद्याच तोडण्याचे नमुद होते. मात्र, झाडच तोडण्यात आले. त्यामुळे कंत्राटदाराचे हित तर जोपासले जात नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी वृक्षप्रेमींची आहे.

बाजारातील विकास कामे करताना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या कापण्याचे आदेश देण्यात आले. असे काही अडथळ्यांचे झाडे गावामध्ये आसल्यास त्या वॉडातील नगरसेवकाच्या माध्यमातून हे काम करण्यात येईल.
- गजनान राऊत, नगराध्यक्ष, समुद्रपूर.

विकासाच्या नावावर बाजारामधील वृक्षाची अवैध कत्तल करणे हे संयुक्तीक नसून नगराध्यक्ष आपल्या मनमानी कारभाराने वृक्षाची कत्तल करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देत आहे.
- दिनेश निखाडे, नगरसेवक, समुद्रपूर.

Web Title: Kultur kills the trees for a hundred years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.