गॅस सिलिंडर एजन्सीच्या मनमर्जीला आळा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 09:47 PM2018-09-21T21:47:59+5:302018-09-21T21:49:31+5:30

देवळी येथील गॅस सिलिंडर एजन्सीच्या मनमर्जी कारभाराचा तेथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनातील पुरवठा विभागाने लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी युवा परिवर्तन की आवाजच्यावतीने करण्यात आली आहे.

Insist on gas cylinders! | गॅस सिलिंडर एजन्सीच्या मनमर्जीला आळा घाला

गॅस सिलिंडर एजन्सीच्या मनमर्जीला आळा घाला

Next
ठळक मुद्देयुवा परिवर्तनची मागणी : जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देवळी येथील गॅस सिलिंडर एजन्सीच्या मनमर्जी कारभाराचा तेथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनातील पुरवठा विभागाने लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी युवा परिवर्तन की आवाजच्यावतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड यांना सादर करण्यात आले आहे.
देवळी येथील आर. इंडियन गॅस एजन्सीच्या माध्यमातून नागरिकांना घरगुती गॅस सिलिंडर वितरीत करण्यात येते. असे असले तरी ऐन सणासुदीच्या व उत्सवाच्या दिवसात आॅन लाईन नोंदणी करूनही वेळीच गॅस सिलिंडर ग्राहकांना दिल्या जात नाही. इतकेच नव्हे तर ग्राहकांकडून अ‍ॅडवान्स बुकिंगच्या नावाखाली पैसे उकळले जात आहे. प्रत्येक ग्राहकाला घरपोच गॅस सिलिंडर देणे क्रमप्राप्त असतानाही अनेक ग्राहकांच्या घरी गॅस सिलिंडर पोहोचविल्या जात नाही. यामुळे तेथील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रकरणी तात्काळ लक्ष देत योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
जिल्हा पुरवठा अधिकाºयांना निवेदन देताना युवा परिवर्तन की आवाजचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच देवळी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनातून करण्यात आलेल्या मागणीचा विचार वेळीच न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही युवा परिवर्तन की आवाजच्यावतीने देण्यात आला आहे.
 

Web Title: Insist on gas cylinders!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.