‘त्या’ बियाण्यांप्रकरणी अखेर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:33 AM2017-11-17T00:33:46+5:302017-11-17T00:33:58+5:30

कपाशीच्या बीटी बियाण्यांवर किमान १२० दिवस अळ्यांचा आणि कुठल्याही किडीचा हल्ला होत नाही, असे सांगून शेतकºयांना कावेरी सिड्स व बायर इंडिया लिमी. या कंपनीने बियाणे दिले.

Indictable offense culminated in 'those' seeds | ‘त्या’ बियाण्यांप्रकरणी अखेर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

‘त्या’ बियाण्यांप्रकरणी अखेर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

Next
ठळक मुद्देशेतकºयांची तक्रार : १२० दिवसात बीटीवर बोंडअळी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कपाशीच्या बीटी बियाण्यांवर किमान १२० दिवस अळ्यांचा आणि कुठल्याही किडीचा हल्ला होत नाही, असे सांगून शेतकºयांना कावेरी सिड्स व बायर इंडिया लिमी. या कंपनीने बियाणे दिले. या बियाण्यांवर वेळेच्या पूर्वीच अळ्यांनी हल्ला चढविला. यामुळे शेतकºयांनी या कंपनीविरोधात सामुहिक तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाअंती या कंपनीवर गुरुवारी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील कारवाईचा निर्णय झाला आहे.
विजयगोपाल, देवळी परिसरातील शेतकरी विजय पेटकर व अशोक मारोटकर या शेतकºयांनी त्यांच्या शेतात मे. कावेरी सिड कंपनी लि. या कंपनीचे कापूस बियाणे मनीमेकर बी.जी. २, लॉट नं. १३००९ या वाणाची लागवड केली. कंपनीच्या दाव्याच्या विपरीत १२० दिवसांच्या आत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होवून कापूस पिकांचे नुकसान झाले. या व्यतिरिक्त याच परिसरातील शेतकरी विजय पेटकर, अशोक मारोटकर व श्रीकांत शिरे यांनी त्याच्या शेतातील इतर जागेत मे. बायर इंडिया लिमी. या उत्पादक कंपनीचे कापूस बियाणे सुपर्ब बी.जी. २, लॉट नं. ४७२९००५ व बायर ७५७६, लॉट नं. १७४९६००१४ या वाणांची लागवड केल्याने कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव १२० दिवसाच्या आत होवून नुकसान झाल्याने एकूण ३६ शेतकºयांनी सामुहिक तक्रार जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
तक्रारीवरुन बीज निरीक्षक तथा कृषी अधिकाºयांनी प्राथमिक व नंतर जिल्हास्तरीय समितीने केलेल्या पाहणी दरम्यान कावेरी सिड व मे. बायर क्रॉप सायन्स लिमी. मुंबई या कंपनीचे बियाणे शेतकºयाने लागवड केल्याने पिकांवर १२० दिवसाच्या आत गुलाबी बोंड अळींचा प्रादुर्भाव झाल्याने पीक नष्ट झाल्याचे स्पष्ट झाले.
झालेल्या चौकशीअंती कावेरी सिड व मे. बायर क्रॉप सायन्स लिमी. मुंबई यांनी बियाणे कायदा १६६ चे कलम ६(ए), ६(बी), ७(ए), ६(सी) बियाणे नियम १९६८ चे नियम ७, ८ महाराष्ट्र कापूस बि बियाणे (पुरवठा, वितरण, विक्री व विक्रीच्या मितीचे निश्चितकरण यांचे विनियमन) अधिनियम २००९ चे कलम ४(१)(२), १२(१),१२(२)(ए), १२(२)(डी), १२(२)(एफ), १२(२)(जी) तसेच नियम २०१० चे ३(१)व ३(२) चे पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ अंतर्गत पर्यावरण संरक्षण अधिसुचना दि. ५ डिसेंबर १९८९ कलम ७, ८,९,१० चे आय पी सी ४०६ व ४२० चे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले.
जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक प्रदीप म्हसकर तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय वर्धा यांनी कावेरी सिड कंपनी लि. व मे. बायर क्रॉप सायन्स लि. या कंपन्यांविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरुन देवळी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. सदर प्रकरणी न्यायालयाची परवानगी घेवून पुढील तपास करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी कळविले आहे.
पाशा पटेल यांनी दिली होती भेट
देवळी तालुक्यातील विजयगोपाल येथील शेतकºयांनी त्यांच्या शेतात लावलेल्या बीटी कपाशीवर बोंडअळी आली होती. याची तक्रार पोलिसात करूनही गुन्हा दाखल केला नसल्याचे समोर आले. यामुळे अखेर कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी या शेतकºयांच्या शेताला भेट देऊन पाहणी केली. येथूनच त्यांनी या कंपनीवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्याची माहिती आहे.

Web Title: Indictable offense culminated in 'those' seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.