यशोदेच्या पुनरूज्जीवनामुळे जल पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 12:14 AM2018-06-07T00:14:41+5:302018-06-07T00:14:41+5:30

जलयुक्त शिवार अंतर्गत कमलनयन बजाज फाऊंडेशन व टाटा ट्रस्टच्यावतीने यशोदा नदी खोरे पुनरूजीवन प्रकल्प उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमादरम्यान जलसंवर्धनाचे काम योग्य पद्धतीने झाल्याने भूगर्भातील जलपातळीत वाढ झाली असून याचा लाभ सध्या शेतकऱ्यांना मिळत आहे.

Increased water level due to revival of Yashoda | यशोदेच्या पुनरूज्जीवनामुळे जल पातळीत वाढ

यशोदेच्या पुनरूज्जीवनामुळे जल पातळीत वाढ

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : जलयुक्त शिवार योजनेतून झाले जलसंवर्धनाचे प्रभावी काम

लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जा.) : जलयुक्त शिवार अंतर्गत कमलनयन बजाज फाऊंडेशन व टाटा ट्रस्टच्यावतीने यशोदा नदी खोरे पुनरूजीवन प्रकल्प उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमादरम्यान जलसंवर्धनाचे काम योग्य पद्धतीने झाल्याने भूगर्भातील जलपातळीत वाढ झाली असून याचा लाभ सध्या शेतकऱ्यांना मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना हे काम दिलासा देणारे ठरले असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
यशोदा नदी व इतरही नदी नाल्यांचे जलस्त्रोत बंद झाले होते. नदी पात्राला काटेरी तथा बेशरमच्या झाडांच्या झुडपांनी वेढले होते. यामुळे नदी पात्र कोरडी झाली होती. शिवाय पाणी साठवण क्षमताही कमी झाली होती. याचाच परिणाम परिसरातील विहिरींवर होत भूगर्भातील जलपातळीत घट झाली होती. शेतात विहीर असूनही बहूदा शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणीच उपलब्ध राहत नव्हते. त्यातच या भागातील नदी व नाल्यामधील गाळ काढून त्यांची पाणी साठवण क्षमता वाढण्याचे काम जलयुक्त शिवार योजनेच्या अंतर्गत हाती घेण्यात आले. जलसंवर्धन व पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन हा हेतून केंद्रस्थानी ठेवून युद्धपातळीवर नियोजनबद्ध काम करण्यात आले. याचा लाभ सध्या चिकणी, जामणी, निमगाव, पढेगाव शिवारात दिसून येत आहे. सदर गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेतून कमलनयन बजाज फाऊंडेशन तथा टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने नदीचे पात्राचे खोलीकरण, रूंदीकरण व सरळीकरण करण्यात आले. यामुळे त्यांची पाणी साठवण क्षमता वाढली आहे. याचा लाभ शेतकºयांसह पशुपालकांना होत आहे.

Web Title: Increased water level due to revival of Yashoda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी