पदांच्या माहितीसाठी अडले बोरच्या बफर झोनच्या एकसंध नियंत्रणाचे घोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2022 05:00 AM2022-04-06T05:00:00+5:302022-04-06T05:00:01+5:30

बोर व्याघ्र प्रकल्पाचा कोअर झोन १३ हजार ८०० हेक्टर, तर बफर झोन ६७ हजार ८१४. ४६ हेक्टर आहे; पण बफर झोनची जबाबदारी सद्य:स्थितीत प्रादेशिक वन विभागाकडे आहे. आपत्कालीन परिस्थितीत कुठले ठोस निर्णय घेताना अधिकाऱ्यांची बहुधा तारांबळ उडते. याच समस्येवर मात करण्यासह वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन याला केंद्रस्थानी ठेवून बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनचे एकसंघ नियंत्रण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला; पण मुंबई येथील अधिकारी प्रस्तावात त्रुटी काढण्यातच धन्यता मानत आहेत.

Horses of homogeneous control of the buffer zone of Adele Bore for position information | पदांच्या माहितीसाठी अडले बोरच्या बफर झोनच्या एकसंध नियंत्रणाचे घोडे

पदांच्या माहितीसाठी अडले बोरच्या बफर झोनच्या एकसंध नियंत्रणाचे घोडे

Next

महेश सायखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा : देशातील सर्वांत छोटा व्याघ्र प्रकल्प अशी बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख असून, याच व्याघ्र प्रकल्पाच्या बफरझोनचा एकसंघ नियंत्रण (युनिफाइड कंट्रोल)चा प्रस्ताव मागील काही वर्षांपासून शासनदरबारी धूळखात आहे. बोर व्याघ्र प्रकल्पाचा बफर झोन २०१५ मध्ये जाहीर करण्यात आला,  तर त्याचे एकसंघ नियंत्रण हे वन्यजीवांच्या संरक्षणासह संवर्धनासाठी महत्त्वाचेच आहे.
सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात सुमारे सहा प्राैढ वाघ, दहा ते बारा बिबटे, ३५ अस्वले, २६ हून जास्त रानकुत्री, हजारोंच्या संख्येने सांबर, चितळ, नीलगाय आदी वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. इतकेच नव्हे, तर या व्याघ्र प्रकल्पाच्या बफर, तसेच बफर झोनच्या शेजारी असलेल्या प्रादेशिक वन विभागाच्या जंगलांमध्येही मोठ्या संख्येने वाघांचे वास्तव्य आहे. त्यामुळे हा प्रकल्प वाघांच्या संवर्धनासाठी उपयुक्त ठरणारा आहे.
बोर व्याघ्र प्रकल्पाचा कोअर झोन १३ हजार ८०० हेक्टर, तर बफर झोन ६७ हजार ८१४. ४६ हेक्टर आहे; पण बफर झोनची जबाबदारी सद्य:स्थितीत प्रादेशिक वन विभागाकडे आहे. आपत्कालीन परिस्थितीत कुठले ठोस निर्णय घेताना अधिकाऱ्यांची बहुधा तारांबळ उडते. याच समस्येवर मात करण्यासह वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन याला केंद्रस्थानी ठेवून बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनचे एकसंघ नियंत्रण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला; पण मुंबई येथील अधिकारी प्रस्तावात त्रुटी काढण्यातच धन्यता मानत आहेत.
नागपूर येथील प्रादेशिक वन विभागाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी युनिफाइड कंट्रोल प्रस्तावात अधिकाऱ्यांच्या बाबतीत पदांची सविस्तर माहिती मागितली असून, नागपूरचा प्रादेशिक वन विभाग आता या त्रुटीची पूर्तता करणार आहे. १५ एप्रिलनंतर पदाबाबतची सविस्तर माहिती वरिष्ठांना सादर होण्याची शक्यता असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.

वर्ध्याच्या उपवनसंरक्षकांनी ८ मे २०२० ला पाठविला प्रस्ताव
-    उपवनसंरक्षक वर्धा यांनी ८ मे २०२० रोजी बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनच्या एकसंघ नियंत्रणाचा प्रस्ताव मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचालक पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर यांना पाठविला. त्यानंतर या कार्यालयाने हा प्रस्ताव कार्यालयीन कार्यवाही करून २१ मे २०२० रोजी अप्पर प्रधान मुख्य संरक्षक वन्यजीव यांना पाठविला. अप्पर प्रधान मुख्य संरक्षक वन्यजीव या कार्यालयाने हा प्रस्ताव शासनाला सादर केला असला तरी त्यावर अजूनही ठोस निर्णय झालेला नाही. विशेष म्हणजे बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनचे एकसंघ नियंत्रण झाल्यास मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करता येणार आहेत, तसेच या परिसराचे नियंत्रण हे वन्यजीव विभागाकडे जाणार आहे.

तीन रेंज होणार; अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची सेवा होणार अधिग्रहित
-    बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनचे एकसंघ नियंत्रण झाल्यास बफर हिंगणी, कवडस व खरांगणा असे तीन रेंज तयार होणार आहेत. इतकेच नव्हे, तर या क्षेत्रात येणाऱ्या प्रादेशिकच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची सेवा अधिग्रहित केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
-    एकूणच बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनचे एकसंघ नियंत्रण झाल्यास त्याचा सर्वाधिक फायदा जिल्ह्यात वन्यजीवांचे संगोपन करण्यासाठीच होणार आहे.

 

Web Title: Horses of homogeneous control of the buffer zone of Adele Bore for position information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.