रमार्इंनी बाबासाहेबांना समर्थ साथ दिल्याने इतिहास घडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:02 AM2019-06-26T00:02:41+5:302019-06-26T00:07:48+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना साथ मिळाली ती रमाबार्इंची. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वेळप्रसंगी समाजाचा रोष पत्करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबतीला त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या त्यामुळे त्यांनी आपले वेगळे अस्तित्व जगासमोर निर्माण केले,........

History has given birth to the support of Babasaheb | रमार्इंनी बाबासाहेबांना समर्थ साथ दिल्याने इतिहास घडला

रमार्इंनी बाबासाहेबांना समर्थ साथ दिल्याने इतिहास घडला

Next
ठळक मुद्देरामदास तडस : दुरगुडा येथे रमाईच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना साथ मिळाली ती रमाबार्इंची. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वेळप्रसंगी समाजाचा रोष पत्करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबतीला त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या त्यामुळे त्यांनी आपले वेगळे अस्तित्व जगासमोर निर्माण केले, त्यांचा सन्मान व्हावा या दृष्टीकोनातून भिमाई महिला मंडळ यांनी पुतळा उभा केला हे कार्य अभिनंदनीय आहे त्यामुळे प्रत्येक महिलांनी त्यांचा आदर्श घेऊन आपल्या परिवाराला समोर नेण्याकरिता प्रयत्न करावेत असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी यावेळी केली.
दुरगुडा येथे भिमाई महिला मंडळाच्यावतीने आयोजीत रमाबाई आंबेडकर यांच्या पुतळयाचे अनावरण खासदार रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला रिपाइंचे अध्यक्ष मारोतराव लोहवे, माजी सैनिक ज्ञानोबाजी थुल, उपसरपंच धरमपाल मुन, भाजयुमो तालुका अध्यक्ष अरविंद झाडे, सुभाष रागीट, पोलीस पाटील संध्या म्हैसकर, लोणीचे सरपंच वैभव श्यामकुवंर उपस्थित होते. भिमाई महिला मंडळ दुरगुडा यांच्या प्रयत्नातून रमाबाई पुतळा उभारण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन भिमाई महिला मंडळाचे अध्यक्ष अंजना झामरे यांनी केले तर आभार सचिव साधना पाटील यांनी मानले. यावेळी खासदार रामदास तडस यांनी केंद्र व राज्य सरकारने मागासवर्गीय समाजासाठी विविध योजना कार्यान्वित केल्या असल्याचे सांगितले. या योजनांचा लाभ घेऊन समाजाने आपला आर्थिकस्तर उंचविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले.
कार्यक्रमासाठी भिमाई महिला मंडळाचे अध्यक्ष अंजना झामरे, उपाध्यक्ष निशा मून, सचिव साधना पाटील, सदस्य संगीता नगराळे, अमिता भि. तेलतुमडे, वंदना मुन, माधुरी मून, विशाखा मून, सुशिला वाघमारे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: History has given birth to the support of Babasaheb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.