फुले दाम्पत्यास भारतरत्न द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:07 AM2018-01-13T00:07:46+5:302018-01-13T00:08:02+5:30

महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान कराण्यात यावा. फुले दाम्पत्याचे समाजाकरिता असलेले कार्य पाहता त्यांना सर्वोच्च नागरी देण्याची, मागणी माळी समाज संस्थेच्यावतीने जिल्हाधिकऱ्यांकडे शुक्रवारी करण्यात आली. विशाल हजारे यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

Give Bharat Ratna to Flowers | फुले दाम्पत्यास भारतरत्न द्या

फुले दाम्पत्यास भारतरत्न द्या

Next
ठळक मुद्देमाळी समाज संस्थेची मागणी : शासनाला साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान कराण्यात यावा. फुले दाम्पत्याचे समाजाकरिता असलेले कार्य पाहता त्यांना सर्वोच्च नागरी देण्याची, मागणी माळी समाज संस्थेच्यावतीने जिल्हाधिकऱ्यांकडे शुक्रवारी करण्यात आली. विशाल हजारे यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
यावेळी विनय डहाके, पौर्णिमा पोतदार, ललिता बनसोड, संगीता सुरोसे, विद्या डहाके, पुजा हजारे शालिकराम बनसोड आदी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, स्वातंत्र्योत्तर काळात महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य तसेच स्त्री शिक्षणाच्याबाबत शाळा काढून शिक्षणाचा केलेला प्रसार व कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर त्यांनी घेतलेले शिक्षण आणि शिक्षक व मुख्याध्यापक बनून समाजाला शिक्षण देण्याचे काम केले. पुणे येथील शिक्षण कार्य पाहूण १८५२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पती-पत्नीचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला. व त्यांच्या शाळांना सरकारी अनुदान देऊ केले. सावित्रीबाई फुले यांनी भारतातल्या पहिल्या शिक्षिकेचे शिक्षणव्रत चालूच ठेवले. त्यामुळेच ३ जानेवारी हा सावित्रीबाईची जयंती बालक दिन म्हणून साजरी केली जाते. महात्मा ज्योतिबा फुले हे मराठीचे लेखक, विचारवंत व समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी व बहुजन समाजाच्या समस्या केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. त्यामुळे त्यांना महात्मा ही उपाधी देवून सन्मानित करण्यात आला. १८९० मध्ये त्यांनी शेतकºयाचा आसूड हा ग्रंथ लिहिला. त्यांच्या या कार्याची दखल घेवून शासनाने त्यांना भारतरत्न जाहीर करावा अशी मागणी माळी समाज संस्थेने केली आहे.

Web Title: Give Bharat Ratna to Flowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.