पेट्रोल पंपावर रात्रीच्या तपासणीचे गौडबंगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:37 AM2017-07-19T00:37:04+5:302017-07-19T00:37:04+5:30

जिल्ह्यातील पेट्रोल पंपावरील सुविधांबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच इंडियन आॅईल कंपनीची चमू सोमवारी वर्धेत दाखल झाली.

Gaudabangal of night check on petrol pumps | पेट्रोल पंपावर रात्रीच्या तपासणीचे गौडबंगाल

पेट्रोल पंपावर रात्रीच्या तपासणीचे गौडबंगाल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील पेट्रोल पंपावरील सुविधांबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच इंडियन आॅईल कंपनीची चमू सोमवारी वर्धेत दाखल झाली. या चमूकडून शहरातील इंदिरा गांधी चौक परिसरात असलेल्या पंपावर तपासणी केली. ही तपासणी रात्रीला झाली. शिवाय तपासणीदरम्यान घडलेला घटनाक्रम ही केवळ दिखावा तर नाही ना, अशी शंका उपस्थित होते. रात्रीच्या या तपासणीमागे नेमके गौडबंगाल काय असा, प्रश्न निर्माण झाला आहे.
पेट्रोल पंपावरील ११ पैकी मोजक्या सुविधांचीच माहिती नागरिकांना असल्याचे लोकमतने केलेल्या सर्व्हेत समोर आले. असे असले तरी नियमातील सर्वच सुविधा पंपावर अनिवार्य आहे. याचीच पाहणी करण्याकरिता सोमवारी ही चमू वर्धेत आली. या चमूने आरती चौकातील पेट्रोल पंपाची पाहणी केली. मात्र यावेळी रात्रीचे ८.३० वाजले होते. या अधिकाऱ्यांनी चौकशीच्या नावावर केवळ पंपाच्या परिसरात एक नजर फिरविल्याचेच दिसून आले. यानंतर ही चमू पंप मालकाच्या कॅबिनमध्ये गेली. बराच वेळ झाला तरी ती चमू बाहेर येण्याचे नाव घेत नव्हती. यामुळे या चमुने पंपाची तपासणी केली की नियमांच्या नावावर आपलचं भल करून घेतले, अशी शंका उपस्थित होत आहे.
दाखल झालेल्या या चमूने पंपावर असलेल्या सुविधा नियमानुसार आहे अथवा नाही, याची पाहणी करणे अपेक्षित असताना त्यांच्याकडून केवळ पंप मालकाची कॅबीन राखण्याचा प्रकार घडल्याचे दिसून आले. यामुळे झालेल्या तपासणी केवळ कागदोपत्री पूर्ततेकरिता झाल्याचे दिसून आले. यामुळे कंपनी पंपावर येणाऱ्या ग्राहकांबाबत किती निष्काळजी करतात याचा प्रत्यय येतो.

अधिकाऱ्यांचा बोलण्यास नकार
पंपावर तपासणीकरिता आलेल्या अधिकाऱ्यांची नियम आणि सुविधांबाबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. पंपमालक नवनित सोमाणी यांनी मात्र होत असलेली तपासणी नियमित असल्याचे सांगितले. त्यांनी या अधिकाऱ्यांशी बोलणी घडवून देण्याचा प्रयत्न केला असता अधिकाऱ्यांनी नकार दिल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

Web Title: Gaudabangal of night check on petrol pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.