सेलूच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 10:35 PM2018-04-19T22:35:52+5:302018-04-19T22:35:52+5:30

शहरातील विविध विकास कामांचा श्रीगणेशा खा. रामदास तडस व आ. डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान खा. तडस व आ. डॉ. भोयर यांनी सेलू शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली.

Funding for Sailoo's development will not ease | सेलूच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

सेलूच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

googlenewsNext
ठळक मुद्देखासदारांसह आमदारांची ग्वाही : विविध विकास कामांचा श्रीगणेशा

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : शहरातील विविध विकास कामांचा श्रीगणेशा खा. रामदास तडस व आ. डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान खा. तडस व आ. डॉ. भोयर यांनी सेलू शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली.
भाजप सेलूच्यावतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. डॉ. पंकज भोयर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. च्या महिला बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, पं. स. सभापती जयश्री खोडे, नगराध्यक्ष डॉ. राजेश जयस्वाल, उपाध्यक्ष चुडामन हांडे, भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक कलोडे, नगरपंचायतचे विरोधी पक्ष नेता शैलेंद्र दप्तरी, जि.प. सदस्य विनोद लाखे, वरूण दप्तरी, जलतज्ञ मनोहर सोमनाथे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान जि. प. सदस्य विनोद लाखे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शैलेंद्र दप्तरी यांनी केले. संचालन अशोक कलोडे यांनी केले तर आभार संजय अवचट यांनी मानले. या विशेष कार्यक्रमात माहेर मंगल कार्यालय ते बस स्थानक, संताजी सभागृह ते बस स्थानक या रस्त्याच्या सिमेंटीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. शिवाय ५२५ लाख रुपयांचा निधी खर्चून विविध विकास कामे करण्यात यईल असेही यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता वरूण दप्तरी, शब्बीर अली सय्यद, चंद्रशेखर वंजारी, निसार सैय्यद, मनीष खंडाळकर, हेमंत नाईकवाडे यांच्यासह भाजपाच्या कार्यकत्यांनी सहकार्य केले.

Web Title: Funding for Sailoo's development will not ease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.