तलावातील गाळामुळे शेतशिवार होतेय सुपीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 09:50 PM2019-05-03T21:50:15+5:302019-05-03T21:51:37+5:30

येथील मत्स्यबीज केंद्राच्या तलावाला गाळमुक्त केले जात आहे. हे काम गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार या योजनेच्या माध्यमातून होत आहे. या भागातील शेतकरी सदर उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तलावातील गाळ शेतात टाकून शेतजमीन सुपीक करीत आहेत.

Freshwater farming due to pond silt | तलावातील गाळामुळे शेतशिवार होतेय सुपीक

तलावातील गाळामुळे शेतशिवार होतेय सुपीक

Next
ठळक मुद्देशेणखतावरील खर्चाची बचत : ‘गाळयुक्त’ला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

संघर्ष जाधव।
लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : येथील मत्स्यबीज केंद्राच्या तलावाला गाळमुक्त केले जात आहे. हे काम गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार या योजनेच्या माध्यमातून होत आहे. या भागातील शेतकरी सदर उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तलावातील गाळ शेतात टाकून शेतजमीन सुपीक करीत आहेत. तलावातील गाळ शेतात टाकल्या जात असल्याने शेणखतावर होणाऱ्या चर्चाची बचत होत आहे.
तलाव आणि धरण आदी जलाशयांमधील गाळ शेतजमिनीची पोत वाढविण्यासाठी फायद्याचा ठरत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. तलाव गाळमुक्त होत त्याच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ व्हावी तसेच तलावातील गाळ शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात टाकून शेतजमिनीची पोत सुधारावी या उद्देशाने शासनाच्यावतीने गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. याच योजनेच्या माध्यमातून यंदा येथील मत्स्यबिज केंद्राचा तलाव गाळमुक्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या तलाव गाळमुक्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून सदर गाळ या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात वाहून नेत आहेत. या तलावातून काढण्यात येणार गाळ परिसरातील शेतकऱ्यांनी न्यावा असे आवाहन तहसीलदारांसह इतर बड्या अधिकाऱ्यांनी सुरूवातीला केले होते. त्याच्या आवाहनाला केळझर व परिसरातील शेतकºयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सध्या मिळत आहे.

पैशाची होतेय बचत
सध्या शेणखताचे भाव प्रति ट्रॅक्टर दोन ते अडीच हजार रुपये आहे. तर या तलावातील गाळ वाहून नेण्यासाठी ५०० ते ६०० रुपये खर्च येत आहे. त्यामुळे तलावातील गाळ टाकण्याला शेतकरी प्राधान्य देत असून त्यामुळे त्यांच्या पैशाची बचत होत आहे. तलावातील गाळामुळे परिसरातील शेतशिवार गाळयुक्त होत आहे.
सकाळपासून लागते मालवाहूच्या रांगा
तलावातील गाळ सध्या युद्धपातळीवर काढल्या जात आहे. तलाव गाळमुक्त झाल्यास त्यांच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होणार आहे. असे असले तरी तलावातील गाळ नेण्यासाठी येथे दररोज सकाळपासूनच ट्रक, ट्रॅक्टर या मालवाहू वाहनांच्या रांगात लागत असल्याचे बघावयास मिळते. विशेष म्हणजे जेसीबीच्या साहाय्याने सध्या गाळ काढला जात आहे.

Web Title: Freshwater farming due to pond silt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.