डॉक्टर दाम्पत्याची ‘आस्था’ ठरली प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 12:57 AM2019-05-07T00:57:47+5:302019-05-07T00:58:01+5:30

दहावी सीबीएसईच्या परीक्षेत डॉक्टर दाम्पत्याची आस्था बकाने हिने ९८.६० टक्के गुण संपादिता करून जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. तर हिंगणघाट सिया मानधनिया व वर्धेच्या आदित्य डोर्लीकर या दोघांनी ९७.८ टक्के गुण मिळाल्याने ते द्वितीय स्थानी राहिले. तर कौस्मिन गोटे हा ९७ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात तृतीय आला आहे.

The first to be a 'trust' of a doctor | डॉक्टर दाम्पत्याची ‘आस्था’ ठरली प्रथम

डॉक्टर दाम्पत्याची ‘आस्था’ ठरली प्रथम

googlenewsNext
ठळक मुद्देदहावी सीबीएसई परीक्षेत सिया व आदित्य द्वितीय!

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दहावी सीबीएसईच्या परीक्षेत डॉक्टर दाम्पत्याची आस्था बकाने हिने ९८.६० टक्के गुण संपादिता करून जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. तर हिंगणघाट सिया मानधनिया व वर्धेच्या आदित्य डोर्लीकर या दोघांनी ९७.८ टक्के गुण मिळाल्याने ते द्वितीय स्थानी राहिले. तर कौस्मिन गोटे हा ९७ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात तृतीय आला आहे.
दहावी सीबीएसई परीक्षेत भुगाव येथील भवन्स् लॉयड्स विद्यालयातील आस्था बकाने हिने ९८.६० टक्के गुण घेतले. ती शाळेतून प्रथम आली आहे. तर आदित्य डोर्लीकर याने ९७.८ टक्के व कौस्मिन गोटे यांने ९७ टक्के गुण घेऊन शाळेतून अनुक्रमे द्वितीय व तृतीय येण्याचा मान पटकाविला आहे. सेलूकाटे येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेतील विद्यार्थी फैझान अब्दुल शेख याने ९६.८ टक्के तर आस्था डबले हिने ९६.६ टक्के गुण घेऊन शाळेतून अनुक्रमे प्रथम व द्वितीय येण्याचा मान पटकाविला आहे.
स्कूल आॅफ स्कॉलर शाळेतील गॉडवीन शेलॉम याने ९६.०० टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम येण्याचा बहूमान पटकाविला. अग्रगामी कॉन्व्हेंट स्कूल म्हसाळा या शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. येथे ९६ विद्यार्थ्यांनी दहावी सीबीएसईची परीक्षा देत घवघवीत यश संपादीत केले आहे. या शाळेतील रितू कृपलानी ९६ टक्के गुण घेत प्रथक आला आहे.
न्यू इंग्लिश अ‍ॅकडमी आॅफ जिनीयस वर्धाच्या विद्यार्थ्यांनी दहावी सीबीएसईच्या परीक्षेत धवघवीत यश संपादीत केले आहे. या शाळेतील विधी डेकाटे हिने ९६.८ टक्के, नेहा वरघने हिने ९४.२ टक्के, मृनाल येऊलकर याने ९४.२ टक्के व श्रेया कावरे हिने ९२.२ टक्के गुण घेऊन शाळेतून अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थान प्राप्त केले.
जय महाकाली शिक्षण संस्थाद्वारा संचालीत गांधी सिटी पब्लिक स्कूलचे १०० टक्के विद्यार्थी पास झाले. येथील राधा महेश तेलरांधे हिने ९६.४ टक्के गुण घेत शाळेतून प्रथम येण्याचा मान पटकाविला. या शाळेतील १२६ विद्यार्थ्यांनी दहावी सीबीएसईची परीक्षा देत घवघवीत यश संपादीत केले. चन्नावार ई विद्या मंदिरचा निकाल १०० टक्के लागला असून रोहन राठी याने ९३.६ टक्के, विनय कोकाटे ९३.००, भाविक अरोरा ९२.६ टक्के गुण घेऊन अनुक्रमे शाळेतून द्वितीय व तृतीय आले आहे.
हिंगणघाट येथील गिरधारीलाल मोहता विद्या मंदिरचा निकाल १०० टक्के लागला आहे. येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादीत केले आहे. सीया मानधनिया हिने ९७.८ टक्के, इशान हिवंज याने ९६.६ टक्के तर गौरी टिबडेवाल हिने ९६.२ टक्के गुण घेऊन शाळेतून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय येण्याचा मान पटकाविला. तर येथीलच सेंट जॉन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दहावी सीबीएसईच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित केले. येथील विद्यार्थी देवयानी हनोते याने ९६ टक्के, हिमांशु मुडे, ९५.८ टक्के तर यशश्री कुकडे हिने ९५ टक्के गुण घेऊन शाळेतून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय येण्याचा मान पटकाविला आहे.
पुलगाव येथील गांधी सिटी पब्लिक स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. असे असले तरी येथीलच केंद्रीय विद्यालयाची रुचा दिघडे हिने ९५.६ टक्के गुण घेऊन तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. केंद्रीय विद्यालयातील ६७ विद्यार्थ्यांपैकी ६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यालयातील शक्ती झांझरी ९४.४ टक्के, अनुज महेश चौधरी ९३.२ टक्के गुण घेऊन शाळेतून अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले आहेत. तर गांधी सिटी पब्लिक स्कूल मधील श्रद्धा सिदुरकर हिने ९५ टक्के, वरूण धामोडे याने ९२ टक्के, अनुष्का पाटणी हिने ९१ टक्के गुण घेऊन शाळेतून अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थान पटकाविले आहे.
आर्वीच्या तपस्या पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दहावी सीबीएसईच्या परीक्षेत घवघवीत यश संपादीत केले. अनुज भटकर हा शाळेतून पहिला आला आहे. तर द्वितीय स्थानी समान गुण घेऊन रोहण वानखेडे व प्रथमेश काटकर राहिला. तसेच ९२ टक्के गुण घेऊन संकेत अघम हा तृतीय स्थानी राहिला आहे. एकूणच दहावी सीबीएसई दहावीच्या निकालात जिल्ह्यातून पहिला येण्याचा मान मुलीने पटकाविला आहे.

Web Title: The first to be a 'trust' of a doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.