रूग्ण शेतकऱ्यांसह किसान अधिकारचा बँकेत ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 11:47 PM2018-09-22T23:47:32+5:302018-09-22T23:47:58+5:30

बँकेत पैसे अडकून पडलेल्या ९५ वर्षीय वयोवृद्ध आजारी शेतकºयाला सोबत घेत त्याच्या परिवारास किसान अधिकारी अभियानच्यावतीने येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयात ठिय्या देण्यात आला.

Farmer's rights with the sick farmers are in the bank | रूग्ण शेतकऱ्यांसह किसान अधिकारचा बँकेत ठिय्या

रूग्ण शेतकऱ्यांसह किसान अधिकारचा बँकेत ठिय्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बँकेत पैसे अडकून पडलेल्या ९५ वर्षीय वयोवृद्ध आजारी शेतकºयाला सोबत घेत त्याच्या परिवारास किसान अधिकारी अभियानच्यावतीने येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयात ठिय्या देण्यात आला. जोपर्यंत देवळी शाखेत अडकलेली एक लाख रूपयांची रक्कम मिळणार नाही, तोपर्यंत येथेच मुक्काम ठोकू, अशी भूमिका घेण्यात आली. लागलीच हालचाली होऊन रक्कम देण्याचे मान्य करण्यात आले.
शेतकरी मारोती भोयर (९५) रा. इसापूर, यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या देवळी शाखेत एक लाख रूपयांची ठेव आहे. ते गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहेत. औषधोपचाराअभावी त्यांंची प्रकृती चिंताजनक होत चालली आहे. परिणामी, मारोती उईके यांच्या आवश्यक उपचार करणे घरच्यांना शक्य नाही. या संदर्भात किसान अधिकार अभियानचे अध्यक्ष सुदाम पवार यांना माहिती मिळाली. त्यांनी शुक्रवारी ९५ वर्षीय रूग्ण शेतकरी, त्यांच्या कुटुंबीय यांच्यासह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यालय गाठले व तिथेच ठिय्या आंदोलन सुरू केले. शेतकºयाच्या औषधोपचाराकरिता जोपर्यंत हक्काचे पैसे मिळणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्याला येथेच झोपवून ठिय्या देऊ, अशी भूमिका घेतली. बँकेचे कार्यकारी अधिकारी कोरडे यांनी पैसे देण्याचे मान्य केले.

Web Title: Farmer's rights with the sick farmers are in the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.