आदिवासी मुला-मुलींसाठी उमरीत वसतिगृहाची झाली सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 11:25 PM2018-02-07T23:25:05+5:302018-02-07T23:25:17+5:30

उमरी मेघे येथे आदिवासी मुलांचे जुने व नवीन शासकीय वसतीगृह आणि मुलींचे शाासकीय वसतिगृहाचे लोकार्पण व साहित्याचे वितरण कार्यक्रम बुधवारी पार पडला. यावेळी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या वसतिगृहाचे लोकार्पण करण्यात आले.

Facilitated the hostel for the tribal children and girls | आदिवासी मुला-मुलींसाठी उमरीत वसतिगृहाची झाली सोय

आदिवासी मुला-मुलींसाठी उमरीत वसतिगृहाची झाली सोय

Next
ठळक मुद्देमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण : ७.५२ कोटींचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : उमरी मेघे येथे आदिवासी मुलांचे जुने व नवीन शासकीय वसतीगृह आणि मुलींचे शाासकीय वसतिगृहाचे लोकार्पण व साहित्याचे वितरण कार्यक्रम बुधवारी पार पडला. यावेळी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या वसतिगृहाचे लोकार्पण करण्यात आले. उमरी येथे आदिवासी मुला-मुलींसाठी वसतीगृहाची सोय झाली असून या उपक्रमासाठी शासनाचा ७.५२ कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर आ. डॉ. पंकज भोयर, जि. प. अध्यक्ष नितीन मडावी, आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त डॉ. माधवी खोडे, जि.प. सदस्य सरस्वती मडावी, उमरी मेघेच्या सरपंच संघमित्रा दखणे, प्रकल्प अधिकारी दिगांबर चव्हाण आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी ना. सावरा यांनी मनोगत व्यक्त केले. आ. भायर यांनी मनोगत व्यक्त करताना ना. सावरा यांच्याकडे सहायक प्रकल्प अधिकारी कार्यालयात कर्मचारी वर्ग देण्याची मागणी केली. याप्रसंगी प्रत्येक जिल्ह्यात आदिवासी निवासी सैनिकी शाळा, नवरगाव या गावाप्रमाणेच जंगलातील गरमसूर या गावाचेही पुनर्वसन करावे, ही मागणी करण्यात आली. याप्रसंगी जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांनीही मनोगत व्यक्त केले. उमरी (मेघे) येथे तीन वसतीगृहासाठी चार एकर जागा शासनाने उपलब्ध करून दिली असून बांधकामासाठी ७ कोटी ५२ लाख रूपयांना निधी खर्च झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. आणखी एका इमारतीचे काम सुरू करायचे असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. नवीन तीनही वसतीगृहाची क्षमता प्रत्येकी १२५ विद्यार्थ्यांची आहे. जिल्ह्यात एकूण १२ वसतीगृह असून त्यापैकी ७ वसतीगृह शासकीय इमारतीमध्ये आहेत. तर उर्वरित भाड्याच्या इमारतीत आहे. सर्व वसतीगृहाची क्षमता १,१५५ विद्यार्थ्यांची आहे. १,०५४ विद्यार्थी सध्या प्रवेशित असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. संचालन जवाहर जोगळे यांनी केले.कार्यक्रमाला प्रशांत बुर्ले, निलेश किटे, राजू मडावी, चेतन पेंदाम आदींची उपस्थिती होती.

Web Title: Facilitated the hostel for the tribal children and girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.